Nashik | नाशिकच्या शेतकऱ्याचा ड्रॅगन फ्रुट शेतीचा अफलातुन प्रयोग

0
40

Nashik | निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हा हतबल झालेला आहे. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ पडतोय. त्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडत आहे. कोणतेही पिक घेतले तरीही ते पावसाच्या अनियमिततेमुळे खराब होत आहे. त्यामुळे नाशकातील शेतकरी हळूहळू पारंपरिक शेतीबरोबरच आधुनिक शेतीकडे वळू लागल्याचं पहायला मिळतंय. निसर्गाच्या लहरीपणावर पणावर मत करत नाशिक जिल्ह्यातील येवला येथील शेतकऱ्याने ड्रॅगन फ्रुटचा मळा फुलवला आहे. ड्रॅगन फ्रूटची शेती कमी पाण्यात होत असल्याने दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसमोर ड्रॅगन फ्रुट शेतीचा उत्तम पर्याय उभा केला आहे.(Nashik)

ड्रॅगन फ्रुट म्हटलं की आजही परदेशातून भारतात आलेलं फळ असं मानलं जात. पण आजकाल देशभरातील शेतकरी ड्रॅगन फ्रुटच्या शेतीकडे वळताना दिसत आहेत. नाशिकमधील येवला तालुक्यातील ममदापूर येथील शेतकरी ‘रामराव गिडगे’ यांनी आधुनिकतेची कास धरत ड्रॅगन फ्रुट शेतीला आपलंस केलेलं आहे. ड्रॅगन फ्रुट शेतीची कणभरही माहिती नसल्याने रामराव यांना आपल्या नातेवाईकांसह गुगल आणि युट्युब याचा चांगलाच हातभार लागल्याचे ते सांगतात. रामराव यांनी कमी पाण्यावर आधारित आणि प्रसंगी दुष्काळातही तग धरू शकेल, अशा पिकांचा अभ्यास सुरू केलेला होता. त्यात त्यांना बहुपयोगी ‘ड्रॅगन फ्रूट’ची माहिती देखील मिळाली. विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतल्यानंतर त्यांनी चाचणी म्हणून अर्धा एकर शेतीत लागवड केली. लागवडीनंतर एक वर्षाला फळधारणा सुरू होते आणि वीस पंचवीस वर्षे उत्पन्न घेता येते. त्या दृष्टीने रामराव यांनी ड्रॅगन फ्रूटच्या शेती साठी स्वतःला झोकून काम सुरु केलेले आहे.

Breaking News | नाशिकमध्ये अजित पवारांचा ताफा अडवला

गिडगे यांना ड्रॅगन फ्रुटची माहीती नातेवाईकांकडून मिळाली. त्याचबरोबर त्यांनी गुगल आणि युट्युबची देखील मदत घेतली. त्यावरून ड्रॅगन फ्रुटच्या शेतीसाठी कमी पाणी  आणि पोषक वातावरण लागत असल्याने दोन्हीची उपलब्धता देखील होती. त्यानुसार त्यांनी यंदा अर्धा एकरवर ड्रॅगन फ्रूटची लागवड केली आहे. यासाठी जवळपास 20 रुपयास एक ड्रगन फ्रूटची कांडी अशा एकूण 1050 कांड्या खरेदी केल्या. आतापर्यत रामराव गिडगे यांना पावणे दोन लाख रुपयांचा खर्च आला असून जुलैमध्ये लागवड केली असल्याने आता अठरा महिन्यापर्यंत फळ येणार आहे. त्यानंतर फळ येण्यास सुरवात झाल्यानंतर दर 45 दिवसांनी फळ येईल अशी माहिती रामराव गिडगे यांनी दिलेली आहे.

दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी एक उत्तम पर्याय म्हणजे ड्रॅगन फ्रुट

नाशिक जिल्ह्यात हळूहळू ड्रॅगन फ्रुट शेतीकडे शेतकरी वळू लागलेला आहे. रामराव  गिडगे यांनी देखील पारंपरिक शेतीला फाटा देत एक वेगळा प्रयोग करत इतर शेतकऱ्यांनाही अपारंपरिक पिके घेण्याची प्रेरणा दिलेली आहे. नाशिकमधील अनेक शेतकऱ्यांनी आजवर शेतीत नवनवीन प्रयोग करत सफरचंद, केसर आंबा, स्ट्रॉबेरी, रेशीम अशी वेगवेगळी उत्पादने घेतलेली आहेत. ड्रॅगन फ्रुट हे हलक्या प्रतीच्या जमिनीतसुद्धा चांगले उगवते. ड्रॅगन फ्रुट हे अमेरिकेतील जास्त वाळवंटी भागात आढळते. हे फळ बाहेरुन गुलाबी रंगाचे दिसते. तर याच्या आत पांढरा गर असतो. विशेष म्हणजे ड्रॅगन फ्रुट हे फळ अनेक आजारांवर तसेच त्वचेसाठी गुणकारी असते.

Nashik | नाशिकचे ग्रामदैवत कालिकामातेचे नवरात्रोत्सवात 24 तास दर्शन

सर्वप्रथम एक एकर शेतजमीन मशागतीने भुसभुशीत करण्यात येते. लागवडीसाठी 9 बाय 9 या अंतरावर जमिनीत खड्डे तयार करून त्यावर चार फुट उंचीचे सिमेंट खांब उभे करावे लागतात. ड्रॅगन फ्रुटवर वाफे तयार करण्यात येतात. प्रत्येक सिमेंट खांबाच्या आजूबाजूला 4 रोपट्यांची लागवड करावी लागते. एका एकरच्या लागवडीसाठी तीन लाख रुपये खर्च करण्यात आलं असं शेतकरी सांगतात. ड्रॅगन फळाच्या झाडाची वयोमर्यादा ही 20 ते 22 वर्ष असल्याने अनेक दिवस यापासून मोठे उत्पादन शेतकऱ्याला मिळु शकते.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here