Nashik : नाशिकचे (Nashik) ग्रामदैवत म्हणून ओळख असलेल्या कालिकामाता मंदिर भाविकांसाठी आनंदाची बातमी असून यंदाच्या नवरात्रोत्सव काळात कालिका मंदिर 24 तास खुले ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिरात भाविकांच्या गर्दीचा दिवसेंदिवस वाढणारा ओघ पाहता यंदा कोजागिरी पौर्णिमेपर्यंत हा उत्सव सुरू ठेवण्याचाही नियोजन संस्थान व्यवस्थापनाने केलेले आहे. विशेष म्हणजे त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या धर्तीवर यंदाच्या नवरात्रौत्सवात पेड पासची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल, असा निर्णय मंदिर संस्थांनच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे.
ग्रामदेवता कालिकामातेच्या शारदीय नवरात्रोत्सव 15 ऑक्टोबर पासून सुरु होत आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी कालिकामाता सभागृहात महापालिका, पोलीस प्रशासन यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत भाविकांसाठी 24 तास दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. जास्तीत जास्त भाविकांना देवीचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी यात्रा कालावधी कोजागिरी पौर्णिमेपर्यंत वाढवण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आलेली आहे. गाभार्यातील महालक्ष्मी, सरस्वती आणि महाकाली यांच्या सुंदर मूर्ती भाविकांचे आकर्षण असते. त्यामुळे यात्रा कालावधी वाढवण्याचा विचार संस्थांच्या वतीने करण्यात आलेला आहे. विशेष म्हणजे यात्रोत्सव काळात महापालिकेतर्फे प्लास्टिक बंदी करण्यात आलेली आहे. याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात यावी असे निर्देशही बैठकीत देण्यात आले आहेत.
Big News | शरद पवार निवडणूक आयोगात दाखल; दिल्लीत घडतांय मोठ्या घडामोडी
दरम्यान कालिका मातेच्या नवरात्रोत्सवासाठी 51 CCTV तैनात करण्यात आलेले आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने 40 पुरुष महिला सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात येईल. तसेच महापालिकेकडून देखील 40 सुरक्षारक्षक, तसेच भाविकांसाठी 24 तास दर्शनाची सोय, मंदिर परिसरात रुग्णवाहिकेची सोय, मंदिर परिसरात शंभरहून अधिक स्वयंसेवक, याचबरोबर शंभर रुपयांचा देणगी पास, दोन कोटींचे भावकांसाठी विमा कवच असणार असून तर एक कोटी देव दागिन्यांसाठी विमा कवच असणार असल्याचे बैठकीतून सांगण्यात आलेले आहे. दरम्यान मंदिर परिसरात गर्दी होणार असल्याने पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार आहे.
सप्तशृंगी देवी मंदिरही 24 तास खुले राहणार
सप्तशृंगी देवी विश्वस्त संस्थानाने भाविकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. येत्या नवरात्रोत्सव काळात भाविकांना सप्तशृंगी देवीचे दर्शन हे 24 तास खुले असणार आहे.रोज हजारो भाविक सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी येत असतात. नवरात्रोत्सवात दरम्यान तर मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता सप्तशृंगी गड येथील सप्तशृंगी देवीचे दर्शन व्यवस्था 24 तास सुरू राहिल. भाविकांची संभाव्य गर्दी विचारात घेऊन विश्वस्त संस्थेने सप्तशृंगी मातेचे मंदिर हे 15 ते 24 ऑक्टोबर पर्यंत दर्शनासाठी 24 तास खुले ठेवून भाविकांना श्री सप्तशृंगी मातेचे दर्शनाची विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम