Nashik Crime | नाशकात पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून; पोलिसांकडून तासाभरात कारवाई

0
58
#image_title

Nashik Crime | मागील काही दिवसांपासून नाशिक शहरांमध्ये घडलेल्या खुणांच्या घटनांमुळे शहरात भीतीचे वातावरण आहे. अशातच काल पाथर्डी गावात रात्रीच्या सुमारास जुन्या वादातून एका युवकाचा सहा जणांनी खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. परंतु, नाशिक पोलिसांनी आरोपींना अवघ्या तासाभरात बेड्या ठोकल्या.
काल दिनांक 22 सप्टेंबर रोजी रात्री विल्होळी येथे राहणाऱ्या नटेश विजय साळवे या तरुणाचा खून झाला असून नटेश पाथर्डी गावातील काझीमंजिल इमारती समोरून जात असताना त्याला सहा जणांनी अडवले व त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार करत त्याचा खून केल्याची घटना घडली. ही घटना पूर्ववैमान्यातून झाली असल्याचे सांगितले जात आहे.

Nashik Crime | पत्नी आणि सासरच्यांच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

पोलिसांकडून तातडीने कारवाई

तर, या घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मयताचे नातेवाईक शशिकांत गांगुर्डे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली. यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत यश उर्फ आयुष्य दोंदे, दुर्गेश शार्दुल, प्रफुल्ल दोंदे, गौरव दोंदे, रोहित वाघ आणि करण बाभळ या सहा आरोपींना एका तासाच्या आत अटक केली.  या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here