Nashik Crime | नाशिक पूर्व मतदारसंघात भाजप-शरद पवार गटातील वाद चिघळला; पंचवटी परिसरात कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

0
48
#image_title

Nashik Crime | विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची काल सांगत झाली. या दरम्यान नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील वाद पुन्हा चिघळला असून पुन्हा एकदा जोरदार राडा झाल्याची घटना घडली झाली आहे.

Nashik Crime | निवडणूक आयोगाकडून नाशकात मोठी कारवाई; नामांकित हॉटेलातून कोट्यावधींची रक्कम हस्तगत

भाजप शरद पवार कार्यकर्ते आमने-सामने

पंचवटीतील आडगाव नाका परिसरात शरद पवार गटाचे उमेदवार गणेश गीतेंचे काही कार्यकर्ते प्रचार करून घरी जात असताना भाजपचे उमेदवार राहुल ढिकले यांच्या कार्यकर्त्यांना ते पैसे वाटत असल्याचा संशय आल्यामुळे ढिकलेंच्या कार्यकर्त्यांकडून गीते यांच्या कार्यकर्त्यांना मारझोड केल्याची घटना घडली. या मारामारी दरम्यान तिथे असलेल्या काही गाड्या देखील फोडण्यात आल्या आहेत.

Nashik Crime | राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सलग दोन कारवाया; अवैध मद्यसाठ्यासह एकूण 19 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

संबंधित कार्यकर्त्यांवर पंचवटी पोलिसांकडून कारवाई

या घटनेनंतर परिसरात मोठ्या प्रमाणात जमाव जमा झाल्याने तणावाचे वातावरण झाले होते. पंचवटी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत. संबंधित कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाई करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात सुरू होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here