Nashik Crime | शहरात सायबर भामट्यांकडून नागरीकांना फसवण्याच्या प्रकारात वाढ झाली असून घरबसल्या पैसे कमावण्याचे आमिष दाखवत सायबर भामट्यांकडून नांदगावात एकाला तब्बल 73 लाख 31 हजार 186 रुपयांचा गंडा घालण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी प्रवीण जयकुमार अग्रवाल (रा. कवडेनगर) यांच्याकडून नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
Nashik Crime | उपनगर पोलिसांकडून जेलरोड परीसरात छापेमारी; साडेसात लाखांचा मद्यसाठा जप्त
नेमके काय घडले?
अग्रवाल यांच्या फिर्यादीनुसार दिनांक 24 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर या काळात अग्रवाल यांच्याशी टेलिग्राम वरून एका इसमाने संपर्क साधत सोन्याचे दागिने बनविणाऱ्या ऑस्ट्रेलियन कंपनीचे ब्रँडिंग केल्यास दिवसाला दोन ते पाच हजार रुपये मिळतील. असे आमिष ददाखवले. या आमिषाला बळी पडून अग्रवाल यांनी भामट्याने दिलेल्या वेबसाईटवर अकाउंट उघडले. भामट्याने सुरुवातीला विश्वास संपादन करण्यासाठी त्यांच्या खात्यावर पैसे जमा केले. नंतर वेगवेगळ्या कारणाने विविध बँकेच्या अकाउंटवर पैसे भरण्यास भाग पाडले. अग्रवाल यांच्याकडून भामट्याने आतापर्यंत 73 लाखांपेक्षा अधिक रक्कम उकळल्याची माहीती आहे. याप्रकरणी आता नांदगाव पोलीस ठाण्यात दोन संशयतांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम