Malegaon News | दादा भुसे यांच्या प्रचारार्थ उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मालेगावात जाहीर सभा

0
32
#image_title

Malegaon News | विधानसभा निवडणूक अवघ्या चार दिवसांवर आल्या असून प्रचाराला वेग आला आहे. विधानसभा निवडणुकांची तारीख जाहीर झाल्यापासून सत्ताधारी आणि विरोधकांनी प्रचारासाठी कंबर कसली. प्रचारसभा दौऱ्यांनी महाराष्ट्र दुमदुमून गेला असून यदरम्यान, सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीका केल्या जात आहेत. आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. अशातच उद्धव ठाकरे यांनी काल मालेगावच्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महायुतीचे उमेदवार दादा भुसे यांच्यावर निशाणा साधत सडकून टीका केली होती. यानंतर आता उद्या रविवार दिनांक 17 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दादा भुसे यांच्या प्रचारार्थ मालेगावात जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे काल उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय उत्तर देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Malegaon News | नाशिक मर्चंट बॅंक गैरव्यवहार प्रकरणी मालेगावात ईडीडून छापेमारी

काय म्हणाले उद्धव ठाकरे? 

मालेगावातील महाविकास आघाडीचे ठाकरे गटाचे उमेदवार अद्वय हिरे यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरेंची काल मालेगावात प्रचार सभा पार पडली. यादरम्यान, त्यांनी महायुती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दादा भुसेंवर तोफ डागली. यावेळी बोलताना त्यांनी, “गेल्यावेळी मी आलो होतो. तेव्हा गद्दारांवर काही बोललो नव्हतो. त्यावेळी त्यांनी असं दाखवलं की माझं आणि माझं त्यांचं काही वाकडं नाहीये. पण आता मी या गद्दारांचा भुसा पाडायला आलोय. कामाची यादी माझ्यासमोर आहे. विकास कामांच्या नावाने बोरा वाजलाय. काय विकास केला. कोणते उद्योगधंदे आणले. किती रोजगार निर्मिती केली. किती शेतकरी समाधानी आहेत. गेल्या वेळच्या सभेत अडथळे म्हणून खोदलेले रस्ते अजून देखील तसेच आहेत. त्यामुळे आता गद्दारांना गाडायला आपल्याला दुसरे खड्डे खोदावे लागणार नाहीत.” असं म्हणत जोरदार टीका केली होती.

मुख्यमंत्री शिंदेंवरही साधला निशाणा

पुढे बोलत, “अद्वयला जवळपास वर्षभर तुरुंगात टाकलं सगळीकडे असेच खोटे गुन्हे दाखल करून आमच्या लोकांना तुरुंगात टाकले जात आहे. ज्याप्रकारे अद्वयने सांगितले, त्याचे पूर्वज कोण होते. तसे मिंधेंनी देखील सांगावे, त्यांचे पूर्वज कोण होते व त्यांनी काय केले.” असं म्हणत टीका केली होती.

Malegaon News | मालेगावात सराईतांना धडकी; 320 जणांनी दिले चांगल्या वर्तवणुकीच्या हमीचे बॉण्ड

दरम्यान, उद्या दिनांक 17 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता कॉलेज ग्राउंड मालेगाव येथे महायुतीचे शिंदेसेनेचे उमेदवार दादा भुसे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा पार पडणार असून यावेळी ते काय बोलतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here