Nashik Crime | ‘ मशीन हॅक करून तुमच्या उमेदवाराला विजय मिळवून देतो’ असे आमिष दाखवून 42 लाख रुपयांची मागणी करणाऱ्या संशयीतास गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने तपास करीत मखमलाबाद म्हसरूळ लिंक रोडवरून ताब्यात घेतले आहे.
वसंत गीते यांच्या कार्यकर्त्याकडून केली होती पैशांची मागणी
मुंबईनाका परिसरात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार वसंत गीते यांच्या पक्ष कार्यालयात आनंद पांडुरंग शिरसाठ यांच्या फिर्यादीनुसार, मंगळवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी दुपारी 12:30 वाजता संशयित भगवान सिंग चव्हाण या संशयिताने शिरसाट यांना “मी तुम्हाला ईव्हीएम हॅक करून दहा मतांपैकी तीन ते चार मते मिळवून देत विजय करतो” असे अमिष दाखवून त्याकरिता 42 लाख रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी पाच लाख रुपये लगेच द्यावे लागतील असे सांगितले. मात्र शिरसाठ यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने त्यांना निवडणुकीचे प्रोग्रामिंग करणारे माझ्याच ओळखीचे आहेत. तेव्हा त्यांच्या मदतीने ईव्हीएम हॅक करून तुमच्या उमेदवाराला निवडणुकीत पराभूत करेल अशी धमकी दिली. त्यामुळे शिरसाठ यांनी मुंबईनाका पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली होती.
Nashik Crime | देवळालीत अज्ञातांनी व्यापाऱ्याला लुटले; 60 हजारांची रोकड लंपास
गुन्हे शाखेच्या पथकाकडून संशयित ताब्यात
त्यानंतर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक आयुक्त संदीप मिटके यांच्या सूचनांवरून वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड, सहाय्यक निरीक्षक हेमंत तोडकर, हवालदार प्रशांत मरकड, प्रवीण वाघमारे, उपनिरीक्षक रवींद्र बागुल आदींच्या पथकाने तपास करत संशयिताला मखमलाबाद रोडवरील विठू माऊली कॉलनी परिसरातून ताब्यात घेतले. तर संशयित भगवान सिंह नारायण चव्हाण याच्या जबाबानुसार, तो मागील 15 ते 20 दिवसांपूर्वी रोजगाराच्या निमित्ताने शहरात आला होता व मार्बलचे काम करत असून निवडणूक सुरू असल्याने पैसे कमावण्याच्या लालसेने त्यांनी इव्हीएम मशिन हॅक करून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम