Nashik Crime | नाशकात अवैध सावकारी करून डीएसपी चहाच्या व्यावसायिकाला आत्महत्येकरिता प्रवृत्त केल्यानंतर सराईत सावकार वैभव देवरे पसार झाला आहे. तर देवरेच्या अवैध सावकारीबाबत कोणाची तक्रार फिर्याद असल्यास शहर गुन्हे शाखेची संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर शहर गुन्हे शाखेची चार ते पाच पथके फरार सावकाराच्या मागावर तैनात करण्यात आली असून त्याचा शोध सुरू आहे. याप्रकरणी सावकाराची पत्नी व शालक यांना अटक करण्यात आली आहे.
पोलीस दाखल होण्यापूर्वीच काढला पळ
अवैध सावकारी व चहा व्यवसायिकाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गंगापूर पोलिसात वैभव देवरे, सोनाली देवरे व निखिल पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून धीरज पवार या चहा व्यवसायिकाने नांदुरी घाटात गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणी त्याची पत्नी सोनाली पवार यांनी फिर्याद दाखल केली. दरम्यान गुन्हा दाखल होताच शहर गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती शाखेनं संशयित देवरेच्या घरावर छापा टाकत पत्नी सोनाली आणि शालक निखिल पवार या दोघांना अटक केली असून वैभवने पोलीस दाखल होण्यापूर्वीच पळ काढला होता. त्याचा शोध घेण्याकरिता गुन्हे शाखेची चार ते पाच पथके त्याच्या मागावर तैनात करण्यात आली असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत. वैभव विरोधात यापूर्वीही इंदिरानगर पोलीसात पाच गंभीर गुन्हे दाखल आहेत.
Nashik Crime | नाशकात अवैध बायोडिझेल विक्रीवर रोख लागणार; जिल्हा प्रशासनाकडून तपासणी पथके तैनात
संशयितावर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल
इंदिरानगर पोलीस स्थानकात संशयित सावकार वैभव देवरे यांच्यावर अवैध सावकारी व गंभीर कलमान अंतर्गत पाच गुन्हे दाखल असून हा त्याचा सहावा गुन्हा आहे. दि. 19 ऑक्टोबर रोजी गंगापूर पोलीसात हा गुन्हा दाखल झाला असून दरम्यान, इंदिरानगरला दाखल गुन्ह्यांमध्ये देवरेला जामीन मिळताच त्यांनी सावकारीची उर्वरित वसुली सुरू केली. या कामात वैभवची पत्नी सोनाली व तिचा भाऊ निखिल वैभवचे साथीदार असून जामीन मिळताच नवीन मोबाईल व सिम कार्ड वरून तक्रारदारांना धमक्या देण्याचे काम सुरू होते. अशाच प्रकारे शेती नावावर करून घेण्याचा दम दाखवल्यानंतर धीरज याने आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम