Nashik | काल रामजान ईदनिमित्त मालेगाव येथील ईदगाह मैदानात सामूहिक नमाज पठणावेळी एका तरुणाने पॅलेस्टाइनचा झेंडा फडकावल्याची घटना ताजी असतानाच, आता नाशिक शहरातील सिडको भागात टिपू सुलतानचा फोटो असलेला बॅनर झळकल्याने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, सिडको पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बॅनर हटवून येथील परिस्थिती नियंत्रणात आणली. अधिक माहितीनुसार, नाशिकच्या सिडको भागात १४ एप्रिल रोजी असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोठ्या प्रमाणात बॅनर लावण्यात आले असून, अशातच एका बॅनरवर टिपू सुलतानचा फोटो लावण्यात आला होता. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
Malegaon | मालेगावात सामूहिक नमाज पठणाच्यावेळी फडकावला पॅलेस्टाइनचा ध्वज
सिडको परिसरातील पाटील गार्डनच्या प्रवेशद्वाराजवळ छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि टिपू सुलतान यांचे एकत्रित फोटो असलेला बॅनर लावण्यात आला होता. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छांचा हा बॅनर होता. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तिथे जाऊन हा बॅनर हटवला. तसेच याबाबत संबंधित दोषींवर कारवाई करण्यात आल्याची माहिती अंबड पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप ठाकूर यांनी दिली आहे.
Nashik Loksabha | नाशिकची जागा शिवसेनेलाच; ‘या’ नावावर शिक्कामोर्तब..?
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम