Nashik Crime | नशिकमध्ये पोलिस ठाण्यात पोलिस निरीक्षकाची आत्महत्या

0
15
Nashik Crime
Nashik Crime

Nashik Crime | नाशिक शहर हे विविध कारणांमुळे चर्चेत आहे. नशिक शरतील गुन्हेगारी ही दिवसेंदिवस वाढत असून, यामुळे शहर पोलिसांच्या कार्यावर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात असतात. तर, आगामी निवणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या नाशिकचे राजकीय महत्त्व वाढले असून, यातच आता एक खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे.

काल शिवजयंतीच्या बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस अधिकाऱ्याने पोलीस ठाण्यातच गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे. ही घटना नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यात घडली असून, यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. (Nashik Crime)

Hemant Godse Accident | नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचा भीषण अपघात

अंबड पोलीस ठाण्यामधील स्वतःच्या कॅबीनमध्येच आज सकाळी पोलीस निरीक्षक अशोक नगण (वय ४० वर्ष) यांनी आज सकाळी स्वतःच्या पिस्तूलमधून डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची ढककडायक घटना उघडकीस आली आहे.

नाशिक शहरातील अंबड पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक नगण यांनी पोलिस ठाण्यातच डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केली असून, त्यांच्या या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. शहर पोलिसांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी हे घटनास्थळाकडे रवाना झाले आहे. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.(Nashik Crime)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here