नाशिकच्या ९ पुरुष आणि ८ महिला खेळाडूंची विविध गटातील संभाव्य राज्य क्रिकेट संघात निवड

0
13

नाशिक : जिल्हा क्रिकेटसाठी अतिशय आनंदाची बातमी. बीसीसीआय अंतर्गत खेळल्या जाणाऱ्या आगामी २०२२-२३ च्या स्पर्धेसाठी नाशिकच्या ९ पुरुष आणि ८ महिला खेळाडूंची महाराष्ट्राच्या १९ वर्षाखालील व खुल्या वयोगटातील विविध संभाव्य संघात निवड झाली आहे. ह्या खेळाडू पुण्यातील चाचणी स्पर्धेसाठी रवाना होणार आहे. निवड झालेल्यांपैकी नाशिकचा व राज्याचा आघाडीचा फिरकीपटू सत्यजित बच्छाव सध्या पश्चिम विभागाकडून दुलिप ट्रॉफी स्पर्धा खेळत आहे.

निवड झालेले जिल्ह्यातील खेळाडू : 

१९ वर्षाखालील गट – 

पुरुष : साहिल पारख, ऋषिकेश कातकाडे, प्रतिक तिवारी, रविंद्र मत्च्या.

महिला : ईश्वरी सावकार, शाल्मली क्षात्रिय, अनन्या साळुंखे, पल्लवी बोडके.

वरिष्ठ खुला गट –

महिला : माया सोनवणे, साक्षी कानडी, प्रियांका घोडके, लक्ष्मी यादव.

पुरुष : मुर्तुझा ट्रंकवाला, यासर शेख, तेजस पवार, कुणाल कोठावदे, तन्मय शिरोडे आणि सत्यजित बच्छाव.

यावेळी माहिती देताना जिल्हा क्रिकेट संघटनेने सांगितले की, हे खेळाडू यापूर्वीच्या राज्य क्रिकेट असोसिएशनच्या वतीने वेळोवेळी झालेल्या राज्यस्तरीय आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेतील प्रभावी कामगिरीच्या जोरावरच ह्यांची महाराष्ट्राच्या संभाव्य संघात निवड झाली आहे. तसेच खुल्या गटातील सर्व खेळाडूंनी याआधीही महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केलेले आहे. यातील माया सोनावणे ही महिला आयपीएल सुद्धा खेळलेली आहे, तर सत्यजितही चेन्नई संघाच्या शिबिरात सहभागी झाला होता.

दरम्यान, ह्या अंतिम संघ निवडीसाठी येत्या २४ सप्टेंबरपासून पुणे येथे चाचणी स्पर्धा होणार आहे. या सामन्यांत भाग घेण्यासाठी नाशिकचे सर्व खेळाडू रवाना होत आहेत.

ह्या सर्व होतकरु, उदयोन्मुख क्रिकेटपटूंच्या निवडीमुळे जिल्हा क्रिकेट संघटनेतील अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. यावेळी, नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष विनोद शहा, सचिव समीर रकटे तसेच संघ प्रशिक्षक व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी या क्रिकेटपटूंचे अभिनंदन करत स्पर्धेतील उत्तम कामगिरीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here