Narendra Modi Oathtaking Ceremony | देशात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा सहावा टप्पा पार पडला असून, आता सारवंन उत्सुकता आहे ४ जून रोजी लागणाऱ्या निकालाची. दरम्यान, या पार्श्वभूमीवर भाजपला पुन्हा एकदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार असल्याची चाहूल लागली आहे. त्यामुळे १० जून रोजी दिल्लीत नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या शपथविधीसाठीची (Narendra Modi Oathtaking Ceremony) तयारी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच यासाठी भाजपच्या (BJP) वरिष्ठ नेत्यांपासून ते सामान्य कार्यकर्तेही कामाला लागले आहेत.
Narendra Modi Oathtaking Ceremony | अजित पवारांचा मोठा दावा
दरम्यान, अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू असतानाचा अजित पवारांच्या वक्तव्यामुळे याला दुजोरा मिळाला आहे. सोमवारी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यक्रमात अजित पवारांनी एक वक्तव्य केले. यामुळे चर्चांना उधाण आले आहे. “येत्या १० तारखेला दिल्लीत महत्त्वाची घडामोड घडू शकते”, असा दावा अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला आहे. ही महत्त्वाची घडामोड म्हणजे नरेंद्र मोदी यांचा शपथविधीच असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत.
PM Narendra Modi | काँग्रेस गरीबांचे आरक्षण काढून ते मुस्लिमांना देणार; मोदींचे काँग्रेसवर आरोप
३०० जागांचा आकडा पार करण्याची शक्यता
देशात सहा टप्प्यांचे मतदान झाले असून, अता त्याबाबत आकडेवारी समोर आल्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी आपल्याला जागांचे गणित बांधायला सुरुवात केली आहे. भाजपनेही त्यांचे अंतर्गत सर्व्हे केले असून त्याआधारे आपण नाही ४०० पण निदान ३०० जागांचा आकडा पार करुन विजयी होऊ अशी चाहुल पक्षाच्या वरिष्ठांना लागली आहे. त्यामुळे केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आपण सहा टप्प्यांतच ३०० जागांचा टप्पा पार केल्याचे वक्तव्य केले होते.
तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनीही भाजप ३७० जागांचा आकडा ओलांडेल, असे भाकीत केले होते. त्यामुळे भाजपला विजयाचा फुल्ल कॉन्फिडंस असून, त्यादृष्टीने १० जूनला नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
PM Narendra Modi | मोदींची पिंपळगावमध्ये सभा; भुजबळांची मोठी माहिती
१० जूनला राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापनदिन
दरम्यान, आजचया कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी यंदा राष्ट्रवादी काँग्रेसचा २५ व्या वर्धापनदिनाचा कार्यक्रम हा दिल्लीत होणार असल्याचे संकेत दिले. राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापनदिन देखील १० जूनला असून, आपण १० जून रोजी पक्षाचा २५ वा वर्धापनदिन साजरा करत आहोत. आपल्याला ‘राष्ट्रीय पक्ष’ म्हणून मान्यता मिळवायची आहे.
आजच्या या पक्ष प्रवेशामुळे आपल्याला आणखी बळ मिळालेलं आहे. पक्षाचे पुढील अधिवेशन हे षणमुखानंद की दिल्ली येथे तालकठोरा मैदानात घ्यायचं याबाबत लवकरच निर्णय होईल. कारण १० जूनला आणखी काही वेगळा निर्णय झाल्यास आपलं अधिवेशन हे मागेपुढे होऊ शकतं. कार्यकर्त्यांनी ही बाब लक्षात ठेवावी, असे सूचक वक्तव्य अजित पवार यांनी केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम