Nana patole : सत्तेसाठी भुकेल्या भाजपने राज्यात तोडफोडीचे महाभारत चालवलं आहे.

0
10

Mumbai : राज्यात पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाने तोडफोडीचे राजकारण केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एक गटसोबत सोबत घेऊन पुन्हा घरोबा केला. दिवसागणिक सत्ताधाऱ्यांचं जनमाणसातून समर्थन कमी होत असल्याने ते आता सत्तेसाठी काहीही करण्याचा भाजपचा हा विकृत पॅटर्न आहे. महाराष्ट्राची सर्वसामान्य जनता सत्तेचा हा खेळ उघड्या डोळ्यांनी पहातेय. सत्ताधाऱ्यांनी लोकशाही आणि संविधानाला धाब्यावर बसवून खुर्चीचा खेळ सुरु केला आहे. इतकंच नाही तर महाराष्ट्रामध्ये लोकशाहीच वस्त्रहरण सुरु असून सत्तेसाठी भुकेल्या भाजपने राज्यात तोडफोडीचे महाभारत चालवलं आहे. यामुळे आगामी निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता भाजपाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.

 

भाजपचा जन आधार कमी होत आहे. हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकमध्ये काँग्रेसला मिळालेल्या मोठ्या विजयाने भाजपच्या पायाखालची जमीन सरकली आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानमध्ये देखील भाजपाचा दारुण पराभव होत असल्याचे दिसत आहे. देशात आणि केंद्रामध्ये परिवर्तन करण्याचा जनतेचा इरादा आहे.

 

महाराष्ट्रात काँग्रेस आघाडीला जनतेचे समर्थन मिळत असल्याने सत्ताधाऱ्यांनी आता फोडाफोडीच्या राजकारणाला सुरवात केली आहे. ईडी सरकार बहुमताचा दावा करत असताना त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाला सोबत घेण्याची गरज नव्हती. पण आगामी निवडणुकीत लाज राखण्यासाठी याशिवाय भाजपकडे पर्याय नव्हता. त्यामुळे सत्तेच्या हव्यासातून त्यांनी हे केलं आहे.

 

उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर गेल्याने हिंदुत्व धोक्यात आल्याचा आव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला होता. बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जात असल्याचा दावा ते करत असतात. आता अजित पवारांच्या नेतृत्वाखाली त्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटासोबत सत्तेत बसताना शिंदेंचे हिंदुत्व पावन झाले का? याचे उत्तर जनतेला द्यावे लागेल. परवा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ७० हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप केला, आता भाजप, नरेंद्र मोदी आणि फडणवीस कोणत्या तोंडाने राष्ट्रवादीच्या एका गटासोबत सत्तेत बसले आहेत? असा सवाल पटोले यांनी उपस्थित केला.

 

कोण-कोणाबरोबर सत्तेसाठी घरोबा करत आहे हे जनतेला दिसत आहे. जनतेला हे फोडाफोडीचे राजकारण आवडलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटाने जाण्याने काँग्रेस आघाडीवर कसलाही परिणाम होणार नाही, उलट काँग्रेस पक्ष जास्त ताकदीने आणि जनतेच्या विश्वासावर मोठ्या बहुमताने निवडून येईल. होऊ घातलेल्या निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखालील तसेच केंद्रातही सरकार सत्तेत येईल, असा विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here