Currency Scam : गेल्या काही दिवसांपासून राज्यात २०१६-१७ साली देशातील छापखण्यात ५०० रुपयांच्या ८८१०.६५ दशलक्ष नव्या नोटा छापण्यात आल्या होत्या. मात्र यातील फक्त ७ हजार २५० दशलक्ष नोटाच आरबीआय कडे पोहोचल्या असल्याच्या चर्चांना सध्या मोठ्या प्रमाणावर उधान आल आहे. तर यातील ८८ हजार कोटी रुपये मूल्य असलेल्या १७६ कोटी नोटा गायब झाल्याची माहिती उघड झाली असून या नोटा नेमक्या कुठे गेल्या? याची संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून करण्यात आली आहे.
भारतामध्ये नाशिक, देवास आणि बंगरूळच्या सरकारी नोट छापखान्यामध्ये चलनी नोटा छापल्या जातात. नोटा छापणारे कारखाने हे केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या अख्यातरीत्या येता. तर या ठिकाणी छापल्या जाणाऱ्या नोटा थेट रिझर्व बँकेकडे रवाना करून तिथे इतर प्रक्रिया पूर्ण करून नंतर या नोटा बाजारात चलनासाठी दाखल होतात. अशी सुटसुटीत प्रक्रिया असताना देखील इतक्या मोठ्या प्रमाणावर ५०० रुपयांच्या नोटा गहाळ कशा झाल्या? या कारखान्यांमध्ये छापलेल्या नवीन ५०० रुपयांच्या नोटांमध्ये घोटाळा झाला असून तब्बल ८८ हजार कोटी रुपये गेले कुठे? असे अनेक प्रश्न उपस्थित करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी नाना पटोले यांनी केली आहे.
नोटबंदीनंतर ५०० आणि एक हजार रुपये किमतीच्या जुन्या नोटा रिझर्व्ह बँकेमध्ये जमा करण्यात आल्या होत्या. त्यावेळी १ हजार ६६० कोटी नोटा दैनंदिन चलनात होत्या मात्र रिझर्व्ह बँकेत या जुन्या नोटा जमा झाल्या त्यावेळी २ लाख कोटी नोटा जास्तीच्या जमा झाल्याची माहिती समोर आली असल्याचे म्हणत नोटबंदी नंतर लगेचच नव्या नोटा चलनात आणल्या गेल्या. या नवीन नोटा किती प्रमाणात छापण्यात आल्या? रिझर्व्ह बँकेकडे यातील किती नोटा पोहचल्या आहेत? यासह जुन्या नोटांच्या घोटाळ्याचीही चौकशी झालीच पाहिजे तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील नोटबंदी हा देशातील सर्वात मोठा घोटाळा आहे असं वक्तव्य केलं होतं यामुळे याचा खुलासा केला गेला पाहिजे अशी मागणी पटोले यांनी केली आहे.
दरम्यान नाशिकच्या नोट प्रेस मधून कोणत्याही नोटा गहाळ झाल्या नसल्याचं स्पष्टीकरण नाशिकच्या नोट प्रेस प्रशासनाकडून देण्यात आल होतं. यामुळे किमान नाशिक मधील नोट प्रेस मधून नोटा गायब झाल्याच्या चर्चांना पूर्णविराम लागला होता. मात्र आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या गहाळ झालेल्या नोटांची संयुक्त संसदीय समिती कडून चौकशी करण्यात यावी, असे म्हणत पुन्हा एकदा हा मुद्दा अधोरेखित केला आहे. यामुळे आता शासन याकडे गांभीरतेने लक्ष देऊन काय कारवाई करणार याकडे संपूर्ण देशाच लक्ष आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम