NAMCO Bank | उत्तर महाराष्ट्राची आर्थिक वाहिनी असलेल्या ‘नाशिक मर्चंट को- ऑप. बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी प्रगती पॅनलचीच सत्ता कायम राहिली असून, विजयी पॅनलने सर्व २१ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे. यापैकी दोन जागा ह्या आधीच बिनविरोध निवडून आल्या होत्या. दरम्यान, बहू प्रतीक्षित अशा नामको बँकेच्या संचालक पदासाठीच्या निवडणुका रविवार (दि.२४ डिसेंबर) रोजी पार पडल्या यावेळी गत वर्षीच्या तुलनेत मतदारांचा उत्साह हा कमी असल्याचे दिसून आले. यावेळी केवळ ३० टक्के मतदान झाले होते. (NAMCO Bank)
सत्ताधारी ‘प्रगती पॅनल’च्या विरोधात पॅनल नव्हते. मात्र, सहकार पॅनलचा एक उमेदवार व इतर काही अपक्ष उमेदवार देखील विरोधात होते. एकूण १ लाख ८८ हजार ६३८ पैकी फक्त ५५ हजार ७२५ मतदारांनीच यावेळी मतदान केले. काल नाशिकमधील छत्रपती संभाजी महाराज स्टेडियममध्ये ह्या मतांची मोजणी पार पडली. (NAMCO Bank)
NAMCO Bank | नामको बँक निवडणूक निकाल; ‘हे’ पॅनल आघाडीवर
सूक्ष्म नियोजनामुळे निकाल लवकर
नामको निवडणुकीचा निकाल हा काल सायंकाळी ८ वाजता जाहीर करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक फय्याज मुलाणी, उपनिबंधक संदीप पाटील, राजू द्वप्पर, मनीषा खैरनार, अरुण डोमसे याच्या मार्गदर्शनाखाली टीमने सूक्ष्म नियोजन करून निकाल अपेक्षेपेक्षा लवकर लावण्यासाठी प्रयत्न केले.
दोन जागा बिनविरोध
प्रगती पॅनलच्या महिला उमेदवार शितल भट्टड आणि सपना बागमार या दोन्ही उमेदवारांची आधीच बिनविरोध निवड झाली होती. दरम्यान, तेव्हाच प्रगती पॅनलची विजयी घोडदौड सुरू झाली होती. तसेच हा निकाल हा एकतर्फी लागण्याची शक्यता वर्तविली जात होती. (NAMCO Bank)
Namco Election | नामको बँकेसाठी देवळ्यात 56 .94 टक्के मतदान
विजयामागचे मुख्य कारण | (NAMCO Bank)
प्रगती पॅनलचे उमेदवार सोहनलाल भंडारी, तसेच माजी आमदार वसंत गीते, विजय साने, हेमंत धात्रक यांच्या नेतृत्वाखालील प्रगती पॅनल हे तयार होत असतानाच, नामको बँकेचे माजी संचालक गजानन शेलार यांनी त्यांच्या सहकार पॅनलची तयारी केली होती. पण त्यात त्यांना अपयश आले आणि याचाच विजयी पॅनलला फायदा झाला. आणि विजयी पॅनलची निशाणी असलेली जीप ही सुसाट सुटली आणि ह्या निवडणुकीत प्रगती पॅनलला एकहाती सत्ता मिळाली. (NAMCO Bank)
गेल्या पाच वर्षांच्या कामामुळे बँकेच्या सभासदांमध्ये मोठा विश्वास निर्माण झाला असून, आता आगामी पाच वर्षात हजार कोटी रुपयांच्या ठेवी व कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट तसेच आवास योजना अशा प्रचारात ठेवलेल्या अनेक योजना राबविल्या जाणार आहेत, अशी भावना विजयी उमेदवारांनी व्यक्त केली आहे. (NAMCO Bank)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम