Nagpur | कॉँग्रेसचे ठिय्या आंदोलन; नानांना पोलिसांनी उचलून नेले

0
28
Nagpur
Nagpur

Nagpur | नागपूर येथे सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असून, आज ह्या अधिवेशनाचा दुसऱ्या दिवशी अधिवेशन चांगलंच गाजलं आहे. दरम्यान, आज सभागृहातदेखील विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका तसेच  घोषणाबाजी केलयाने वातावरण चांगलंच तापलेलं होतं. यातच आता कॉंग्रेसकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे. Nagpur

दरम्यान, नागपूर मध्ये आता कॉंग्रेसचं ठिय्या आंदोलन हे सुरु आहे. आणि हे ठिय्या आंदोलन सुरू असतानाच कॉंग्रेसचे नेते नाना पटोले यांना नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या वेळी अक्षरशः नाना पटोले यांना पोलिसांनी उचलून नेल्याचही यावेळी दिसून आलं.

Viral news | बटाट्याच्या नादात स्वतःचेच लग्नच विसरला नवरदेव

न्याय मिळाल्याशिवाय थांबणार नाही

दरम्यान, “न्याय मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही”, अशी भूमिका यावेळी कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी घेतलेली आहे. हे फ्रॉड सरकार आहे अशी टीकाही यावली नाना पाटोले यांनी राज्य सरकारवर केली. राज्यातील वाढती बेरोजगारी तसेच शिक्षित तरुण हे रोजगार नसल्यामुळे घरी बेरोजगार बसलेले आहेत.

त्या विरोधातच हे आंदोलन नागपूर येथे सुरु आहे. राज्यात अनेक ठिकाणी नोकरीची पदे ही रिक्त असतानाही रिक्त पदे भरली जात नाहीये, राज्य सरकार नोकर भरतीतून गरीब विद्यार्थ्यांना लुटत आहेत. अशी टीकाही यावेळी कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी केलेली आहे.Nagpur

कॉंग्रसचे प्रदेशाध्यक्ष्य नाना पटोले हे नागपूरमध्ये महाराष्ट्रातील वाढती महागाई, वाढती बेरोजगारी ह्या मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन करत असताना यावेळी याठिकाणी युवक कॉंग्रेसचे राज्यातील अनेक नेते पदाधिकारी देखील उपस्थित होते.Nagpur

MLA Disqualification | एकनाथ शिंदेंना हटवण्यासाठी विश्वासुंनीच केल्या होत्या सह्या..?

पोलिसांनी नानांना उचलून नेले 

राज्यात तब्बल २५ लाख पद ही रिक्त असतना ती पदं हा भरली जात नाही ? असा सवाल देखील यावेळी युवक कॉंग्रेस च्या वतीने उपस्थित करण्यात आलेला आहे. मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग ह्या ठिय्या आंदोलनात सहभागी असल्याचे पाहायला मिळालं. यावेळी  नागपूर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. यावेळी नाना पटोले यांना अक्षरशः पोलिसांनी उचलून नेत ताब्यात घतेलेले आहे. दरम्यान, पोलिसांना पुढे करून राज्य सरकारकडून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला अजत आहे. असेही नाना पाटोले यावली म्हणाले. Nagpur


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here