मुंबई: सध्या राज्यात बहुतेक ठिकाणी पाणी टंचाईचा प्रश्न तीव्र बनला आहे. अनेक शहरांतील धारणांचा पाणीसाठी खालावल्याने पालिकांकडून पाणी बचतीसंदर्भात निर्णय घेतले जात आहेत. यातच अता मुंबई बृहन्मुंबई महानगरपालिकेनेही मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांच्या पाणीसाठा घटल्याने खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई (Mumbai News) महानगरात गुरुवार (दि. ३० मे) पासून ५ टक्के पाणीकपात (Water Cut)केली जाणार आहे. तर, बुधवार (दि. ५ जून) पासून १० टक्के पाणीकपात लागू केली जाणार आहे.
नागरिकांनी घाबरून जाऊ नये. मात्र, पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहनही बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये एकूण १ लाख ४० हजार २०२ दशलक्ष लीटर इतका पाणीसाठा उपलब्ध असून, वार्षिक पाणीसाठ्याच्या तुलनेत फक्त ९.६९ टक्के इतकाच पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ठाणे, भिवंडी-निजामपूर महानगरपालिका व इतर गावांना जो पाणीपुरवठा केला जातो. त्यात ही ५ आणि १० टक्के पाणी कपात लागू केली जाणार आहे. जलाशयांमध्ये उपयुक्त साठ्यात वाढ होईपर्यंत ही पाणी कपात लागू असणार आहे. (Mumbai Water Cut)
Igatpuri | धरणांच्या तालुक्यातच टँकरद्वारे पाणीपुरवठा; भाम कोरडे तर, भावलीत १% पाणीसाठा
Mumbai Water Cut | बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सूचना
दैनंदिन वापरात पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबतच्या सूचना मुंबई महानगरपालिकेकडून देण्यात आल्या आहेत. त्या सूचना पुढीलप्रमाणे –
- पाणी पेल्यामध्ये घेवून प्यावे. आंघोळीसाठी शॉवरचा न वापरता बादलीत पाणी घेऊन आंघोळ करणे. नळ सुरु ठेवून दात घासू नका किंवा दाढी करू नका.
- भांड्यांमध्ये पाणी घेवून घरकामे करा.
- वाहने धुण्यासाठी ओल्या कापडाने वाहने पुसू शकतात. घरातील लादी, गॅलरी, इ. ओल्या फडक्याने पुसा, धुणे टाळा.
- नळांचा प्रवाह मर्यादीत करणाऱ्या तोटी (नोझल) वापराव्यात. (Mumbai Water Cut)
- हॉटेल्समध्ये ग्राहकांना आवश्यक असल्यासच पेल्यात पाणी द्या किंवा पाण्याची बाटली पुरवावी.
- घरांमध्ये पाण्याच्या वाहिन्या तपासाव्यात. गळती आढल्यास तात्काळ दुरुस्ती करा.
वरील पाणी बचतीचे उपाय अंगीकारणे सहज शक्य असून, नगरिकांनी त्याचा अवलंब करुन पाणीबचत करावी. पाण्याचा अत्यंत काटकसरीने वापर करावा आणि महानगरपालिकेच्या प्रयत्नांना सहकार्य करण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
Gangapur Dam | शनिवारी नाशिकमध्ये पाणी पुरवठा बंद
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम