मुंबई | राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून, सगळीकडे उमेदवार प्रचारासाठी आपापले मतदार संघ पिंजून काढत आहेत. आता राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचे मतदान हे मंगळवारी पार पडणार आहे. यानंतर चौथ्या टप्प्याची निवडणूक ही मुंबई आणि पुण्यात होणार असून, यासाठी अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. (Mumbai News)
तर, राज्याच्या राजधानीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. अशातच मुंबईत घडलेल्या एका संतापजनक प्रकारामुळे मुंबईयचे राजकारण चांगलेच तापले आहे. दरम्यान, ईशान्य मुंबईतील (Mumbai North East Lok Sabha) एका गुजराती रहिवाशांच्या सोसायटीत चक्क ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनाच प्रवेश नाकारण्यात आला आहे. त्यामुळे ऐन मतदानापूर्वी पुन्हा एकदा मुंबईत मराठी विरुद्ध गुजराती हा वाद रंगण्याची शक्यता आहे.
Mumbai News : दहिसर-मिरा मेट्रोखाली सौंदर्यीकरण; मेट्रो प्रवाशांसाठी गुड न्यूज
Mumbai News | नेमकं प्रकरण काय ?
दरम्यान, ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात गुजराती मतदारांची संख्या ही अधिक आहे. काल रविवार रोजी संध्याकाळच्या सुमारास ठाकरे गटाचे कार्यकर्ते हे घाटकोपर पश्चिम या भागात प्रचार करत असताना, या भागातील समर्पण या गुजराती रहिवाशांच्या सोसायटीमध्ये ठाकरेंच्या शिवसैनिकांनाच प्रवेश नाकारण्यात आला. या संबंधित समर्पण सोसायटीत गुजराती रहिवाशांची संख्या अधिक असून, या गुजराती रहिवाशांकडून ठाकरे गटाच्या शिवसैनिकांना सोसायटीच्या आवारात येण्यास मनाई करण्यात आली.
तुम्हाला आमच्या सोसायटीत उमेदवाराचा प्रचार करता येणार नाही, असे या सोसायटीतील रहिवाशांकडून सांगण्यात आले. (Mumbai News) मुंबई जेव्हा मराठी भाषिक नागरिकांना गुजराती नागरिकांकडून काही त्रास दिला जातो. तेव्हा ते दाद मागायला मनसे किंवा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे जातात. मात्र, आता चक्क शिवसैनिकांनाच गुजराती रहिवाशांकडून प्रचारासाठी मज्जाव करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर, याबाबत स्थानिक शाखाप्रमुख प्रदीप मांडवकर आणि खासदार संजय राऊत यांनी आरोप केले आहेत. (Mumbai News)
Mumbai news: मुंबईत १५९ ठिकाणी ‘स्वच्छता हीच सेवा’ अंतर्गत सामूहिक श्रमदान..!
ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना मनाई; भाजपचे स्वागत
ईशान्य मुंबई मतदारसंघ हा गुजराती मतदार संघ असून, हा मतदार संघ भाजपची हक्काची व्होटबँक आहे. येथील गुजराती समाजकडून भाजपला मतदान केले जाते. त्यामुळे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून येथील गुजराती मतदारांना साद घालण्याचा प्रयत्न सुरू होता. परंतु, यावेळी ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना या सोसायटीत प्रवेश नाकारण्यात आला. याउलट येथील भाजपचे स्थानिक आमदार राम कदम मात्र येथील गुजराती रहिवाशांच्या सोसायट्यांमध्ये दारोदारी जात प्रचार करत आहेत. (Mumbai News)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम