मुंबई : मुंबईतील सहाही मतदार संघांसाठी (Mumbai Loksabha) आज मतदान पार पडत आहे. यापैकी ईशान्य मुंबईत मिहिर कोटेचा, संजय दिना पाटील यांच्यात थेट लढत होत आहे. तर, मतदानादरम्यान ईशान्य मुंबईत राडा पाहायला मिळाला. संजय राऊत यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या या मतदान केंद्रावर हा प्रकार घडला.
येथे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून डमी इव्हीएम मशीनद्वारे मतदारांना मार्गदर्शन केले जात होते. यामुळे पोलिसांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यामुळे संजय राऊत आणि सुनील राऊत हे आक्रमक झाले असून, त्यांनी थेट आंदोलनाचा इशारा दिला आहे. निवडणूक आयोगाचे आधिकारी येतील त्यावेळी याबाबत निर्णय घेतला जाईल, असे उत्तर पोलिसांकडून दिले जात आहे.
Shantigiri Maharaj | ईव्हीएमला घातला हार; गुन्हा दाखल होण्याची शक्यता..?
Mumbai Loksabha | नेमकं प्रकरण काय..?
भांडुप (bhandup) येथील मतदान केंद्रांवर हा प्रकार घडला. हे मतदान केंद्र संजय राऊत यांच्या घरापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. हा प्रकार घडल्यानंतर संजय राऊत हे येथे सहकुटुंब मतदान करण्यासाठी दाखल झाले. हा प्रकार समजताच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे चांगलेच आक्रमक झाले असून, त्यांनी याबाबत पोलिसांना जाब विचारला. मतदान केंद्रावर संजय राऊत आणि त्यांचे बंधु सुनिल राऊत हे मतदानासाठी दाखल झाले होते. यावेळी त्यांनी सामान्य मतदारांप्रमाणे रांगेत उभे राहून कुठलीही VIP ट्रीटमेंट न घेता त्यांनी सहकुटुंब मतदान केले. (Mumbai Loksabha)
“पोलिसांवर दबाव असून, पोलिस दबावाखाली काम करत आहेत. हा त्यांचा रडीचा डाव आहे. पोलिसांवर मोठ्या प्रमाणात दबाव टाकला जात आहे. आमचे दोन कार्यकर्ते ताब्यात घेतलेले आहेत. आमच्या शिवसैनिकांना ताबडतोड सोडण्यात यावे, अशी मागणी सुनील राऊत यांनी केली आहे.
तसेच हे कार्यकर्ते मतदान केंद्रापासून ३०० मीटरच्या अंतरावर होते. त्यामुळे कुठल्याही नियमांचे उल्लंघन न झाल्याचे आमदार सुनील राऊत म्हणाले. तसेच या कार्यकर्त्यांवर कारवाई झाली किंवा त्यांना सोडण्यात आले नाही. तर, आंदोलनाचा इशाराही सुनील राऊत यांनी दिला आहे. एकूणच येथे ताणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. (Mumbai Loksabha)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम