Mumbai | मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला सफाई कामगारांच्या वसाहतींबाबत निर्णय

0
39

Mumbai | ‘मुंबई शहर स्वच्छ करणारे  आणि मुंबईकरांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी राबणाऱ्या सफाई कामगारांच्या वसाहतींचा कायापालट करण्यात येईल. या वसाहतीतील सुविधांचा तात्काळ स्वतंत्र टिमद्वारे आढावा घेण्यात यावा, असे निर्देश दिल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.मुंबईकरांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी राबणाऱ्या सफाई कामगारांच्या वसाहतीला भेट देत असताना मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी महात्मा गांधी यांना जयंतीदिनी आगळी स्वच्छांजली अर्पण केल्याचं पहायला मिळालं. मुख्यमंत्र्यांनी आस्थेवाईकपणे सफाई कामगार, त्यांच्या कुटुंबीयांची विचारपूस केल्यामुळे या बांधवानींही मुख्यमंत्र्यांना धन्यवाद दिलेत.आताच्या काळात या वसाहतीला आवर्जून भेट देऊन, तेथील अडचणी समजुन घेणारे, मुख्यमंत्री शिंदे पहिलेच मुख्यमंत्री असल्याचीही प्रतिक्रियाही काही सफाई कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या.(Mumbai)

Nanded News | नांदेड शासकीय रुग्णालयात मृत्यूतांडव सुरुच

स्वच्छतेसाठी ‘एक तारीख एक तास’ या राज्यस्तरीय मोहिमेच्या दुसऱ्या दिवशी आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील विविध प्रभागात भेट देऊन स्वच्छता अभियानाची पाहणी केली. यात प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांनी स्वच्छता कामगार वसाहतीची पाहणी केली. त्यांनी कासार वाडी कोहिनुर मॉलचा परिसर, तसेच गौतम नगर हिंदमाता थिएटर येथे भेट देऊन स्वच्छता अभियानाचा आढावा घेतला. यावेळी आमदार सदा सरवणकर, मुंबई महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉ. आय. एस. चहल आदी उपस्थित होते. पाहणी दौऱ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

Nanded News | नांदेड घटनेवरुन राज ठाकरेंनी सरकारवर साधला निशाणा

मुख्यमंत्री म्हणाले की, या वसाहतीतील गैरसोयींची पाहणी केली. येथे आवश्यक असणाऱ्या सुविधांबाबत मुंबई महापालिकेने स्वतंत्र टिमद्वारे आढावा घ्यावा असे निर्देश दिलेले आहेत. या परिसरातील दोन इमारतींचे काम रखडले आहेत. ते पुर्ण व्हावे याकरिता तत्काळ कार्यवाही करण्यात यावी. दोन शिफ्टमध्ये काम सुरू करावे. या परिसरातील मुख्य रस्ता, अंतर्गत रस्त्यांची कामे पूर्ण व्हावीत. येथील शौचालये, स्वच्छतागृहांची स्थिती सुधारली पाहिजे यासाठी सूचना केल्या आहेत. या ठिकाणी सर्व सोयींनी युक्त अशी अभ्यासिका व्हावी. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात यावा अशा सूचना दिल्या आहेत. या कामगार बांधवांच्या उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या मुलांसाठी एक योजना तयार करावी अशा सूचना महापालिकेल्या दिल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी या उपस्थित कामगरांशीही संवाद साधला.’ आपण सर्व मुंबई शहराच्या आरोग्यासाठी आणि स्वच्छतेसाठी कष्ट करता आणि आपल्यालाच गैरसोयींना तोंड द्यावे लागते. हे चित्र बदलण्यासाठी सर्व ते प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here