Muk Morcha | ‘…तर मुख्यमंत्र्यांचा सत्कार करू’; पहिल्यांदाच हे दृश्य पहायला मिळणार, मविआचे नेते रस्त्यावर उतरणार

0
57
Muk Morcha
Muk Morcha

Muk Morcha | मुंबई : बदलापूर येथील शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचारा प्रकरणी निषेध दर्शवत आज शनिवार 24 ऑगस्ट रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. परंतु काल गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयात बंद बेकायदेशीर असल्याची याचिका दाखल करण्यात आल्यानंतर हायकोर्टाकडून या बंदला बेकायदा ठरवण्यात आले व बंद पार पडल्यास बंद पुकारणाऱ्यांवर आणि बंदात सहभागी होणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असे आदेशही देण्यात आले.

त्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी बंद मागे घेत असल्याची घोषणा ‘मविआ’कडून करण्यात आली. परंतु राज्यभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांवरती कठोर शासन केले जावे याकरिता महाविकास आघाडी अत्याचारांच्या घटनांविरुद्ध मुक आंदोलन करणार असल्याचे जाहीर करण्यात आले. राज्यात ठिकठिकाणी हे आंदोलन आज पार पडणार असून या आंदोलनामध्ये महाविकास आघाडीतील सर्व पक्ष सहभागी होणार आहेत.

Muk Morcha | राज्यातील विविध भागात मविआचे आंदोलन सुरू

शनिवारी काँग्रेसचे नेते तोंडाला काळ्या फिता बांधून घटनेविरुद्ध निषेध जाहीर करतील असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून जाहीर केले गेले. बदलापुरातील घटनेला विरोध दर्शवत नाना पटोले व जितेंद्र आव्हाड यांचे ठाण्यामध्ये निषेध आंदोलन सुरू. ठाण्यातील तलाव पाली भागात महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, विक्रांत चव्हाण यांबरोबर इतर नेत्यांनीही या आंदोलनात सहभाग घेतला आहे.

तर मुंबईत शिवसेना मध्यवर्ती कार्यालय बाहेर काळ्या फिती लावून शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. भर पावसात हे आंदोलन केले जात आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने देखील मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयाच्या बाहेर आंदोलन केले जात आहे.

Pune Muk Morcha | भर पावसात शरद पवारांचे तोंडाला काळा मास्क लाऊन ‘मुक आंदोलन’

सुप्रिया सुळेंचं भर पावसात मुक आंदोलन

राष्ट्रवादी काँग्रेसच शरद पवार गटाचे, अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुण्यामध्ये तोंडाला काळ्या फिती लावून मुक आंदोलन पार पडले. आज सकाळी 10 ते 11 या कालावधीत हे आंदोलन पार पडले. या आंदोलनामध्ये महाविकास आघाडीचे अनेक नेते सहभागी झाले होते. या आंदोलना वेळी बदलापूर मध्ये घडलेल्या घटनेवर पोलिसांनी गांभीर्याने लक्ष दिले नाही. पोलिसांना आपल्या वर्दीची भीती राहिली नाही. हे सरकार अत्यंत असंवेदनशील आहे.

बदलापुरातील आंदोलनावेळी आलेले लोक बाहेरचे होते असा दावा सरकारने केला. लोक कुठलेही असो ते भारतीय होते आणि आपल्या लेकीसाठी लढत होते. त्यामुळे सरकार कोणत्या प्रकारे विचार करतं हे यावेळी दिसून आले. अशी टिका त्यांनी यावेळी केली. तसेच आपल्याला खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. हे आंदोलन एका मोठ्या आंदोलनाची सुरुवात आहे. असं सुप्रिया सुळेंनी यावेळी सांगितलं.

पुणे जिल्ह्यात मुलीवर बलात्कार केलेल्या नराधमाला 2 महिन्यात फाशी दिली. असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांकडून एका सभेमध्ये करण्यात आलं होतं. जर हे खरं असेल तर आपण सर्वांनी मुख्यमंत्र्यांचा सत्कार केला पाहिजे. असे देखील त्यांनी यावेळी सांगितलं. बदलापूरमध्ये घडलेली घटना निंदनीय आहे. ती फक्त त्यांचीच लेक नाही तर आपली ही लेक आहे. तेव्हा सरकारला जमत नसेल तर आपण न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे असं म्हणत मविआतील पक्षांनी त्याची जबाबदारी घेऊया असे त्यांनी सांगितले. यापुढे महाराष्ट्रातील कोणत्याही लेकीवर अशी वेळ येऊ नये त्याकरता आम्ही प्रयत्नशील राहू असे विधानही त्यांनी यावेळी केले.

Chhagan Bhujbal | लाडकी बहिण योजना अविरत सुरू राहील; मंत्री भुजबळांचा बहिणींना विश्वास

तसेच अत्याचार झालेल्या पीडित मुलींची किंवा तिच्या कुटुंबीयांची माहिती समोर न आणून प्रसार माध्यमांनी हे प्रकरण अत्यंत संवेदनशीलपणे हाताळले आहे. असे म्हणत त्यांनी प्रसारमाध्यमांचे आभार मानले व कोणीही पीडित मुलींची नावे किंवा त्यांची ओळख होईल अशी माहिती प्रसारित करू नये. हे प्रकरण सर्वांनी संवेदनशीलरित्या हाताळावे पिडीतांना कुठलाही प्रकारचा त्रास होऊ नये. याची काळजी घेण्यात यावी. असे आवाहन देखील सुप्रिया सुळे यांच्याकडून यादरम्यान करण्यात आले.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here