Deola | देवळा येथे महाविकास आघाडीच्या वतीने तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून ‘मूक आंदोलन’

0
49
Deola
Deola

सोमनाथ जगताप – प्रतिनिधी : देवळा |  बदलापूरमध्ये शाळेत चिमूरड्यांवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ देवळा येथील शिवस्मारकावर शनिवारी (दि.२४) रोजी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aaghadi) पदाधिकाऱ्यांनी तोंडावर काळ्या पट्ट्या बांधून मूक आंदोलन केले. या आंदोलनात महाविद्यालयीन तरुणींनीही आपला सहभाग नोंदवून राज्याच्या गृहखात्याचा निषेध नोंदवला. बदलापूर (ठाणे) (Badlapur) येथील एका नामांकीत शाळेत दोन लहान मुलींवर झालेल्या लैगिंक अत्याचाराची निंदनीय घटना घडली. त्यामुळे पालकवर्गात अस्वस्थता पसरलेली दिसत आहे.(Deola)

Muk Morcha | ‘…तर मुख्यमंत्र्यांचा सत्कार करू’; पहिल्यांदाच हे दृश्य पहायला मिळणार, मविआचे नेते रस्त्यावर उतरणार

या घटनेमुळे राज्यात महाविकास आघाडीकडून निषेध आंदोलनं केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी शनिवारी (दि.२४) रोजी बंदची हाक दिली होती. मात्र हायकोर्टाने कोणत्याही पक्ष संघटनेला बंद पुकारता येणार नाही, असा आदेश दिल्यानंतर महाविकास आघाडीच्या वतीने बंद मागे घेण्यात आला असला तरी मूक आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याने शुक्रवारी सकाळी १० वाजता देवळा येथे महाविकास आघाडी च्या पदाधिकाऱ्यांनी शिवस्मारकाच्या पायऱ्यांवर बसून हातात बदलापूरच्या घटनेच्या निषेधार्थ ‘गृहखात्याच्या निषेध असो’ अशा प्रकारच्या पोस्टर्स घेऊन मूक आंदोलन केले.

Pune Muk Morcha | भर पावसात शरद पवारांचे तोंडाला काळा मास्क लाऊन ‘मुक आंदोलन’

या आंदोलनात शालेय विद्यार्थिनींनीही आपला सहभाग नोंदवला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष पंडितराव निकम, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिनकर निकम, शिवसेनेचे ग्रामीण उप जिल्हाप्रमुख सुनील पवार आदींसह सुनील आहेर, दिलीप पाटील, स्वप्नील सावंत, विजय जगताप, सचिन सूर्यवंशी, प्रशांत शेवाळे, दिलीप आहेर, विश्वनाथ गुंजाळ, संजय साळवे, विलास शिंदे, राजेंद्र शिंदे आदी उपस्थित होते.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here