MPSC 2023 | सरकारी खात्यात ३०३ पदांसाठी भरती; जाणून घ्या अर्ज करण्याची शेवटची तारीख

0
29

MPSC 2023 | सरकारी खात्यांमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या तरूणाईसाठी एक मोठी बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये एकूण 303 रिक्त पदांवर भरती केली जाणार आहे. या संदर्भातली माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर देण्यात आलेली आहे. नुकतीच महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्तची पूर्व परीक्षा पार पडली आहे. ही परीक्षा पार पडल्यानंतर आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध 16 संवर्गाच्या मुख्य परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे.

Crime News | मूलबाळ होत नाही म्हणून विवाहितेचा छळ

एकूण रिक्त जागांची संख्या 303

सहाय्यक राज्यकर आयुक्त, उपजिल्हाधिकारी, सहाय्यक कामगार आयुक्त, सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, उपमुख्य कार्यकारी/ गट विकास अधिकारी, सहाय्यक संचालक महाराष्ट्र वित्त आणि लेखा सेवा, गट-अ 41, सहाय्यक गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी यांसारख्या अनेक जागांसाठी पदभरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती ?

या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही २१ नोव्हेंबर २०२३ आहे. हा अर्ज तुम्हाला https://mpsc.gov.in या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवर करता येईल. या वेबसाईटवरून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकतात. त्यासोबतच, या परीक्षेसंदर्भातली अधिकची माहिती तुम्हाला या वेबसाईटवरून मिळू शकणार आहे.

चांदवड | केंद्रीय पथकानं थेट शेतकऱ्यांच्या बांधावर केली पाहणी; कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मांडल्या व्यथा

अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती ?

  • सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट ब : या पदासाठी अर्ज करणाऱ्या  उमेदवाराने भौतिकशास्त्र आणि गणित विषयांसह विज्ञान किंवा अभियांत्रिकी शाखेतील पदवी हवी.
  • उद्योग अधिकारी (तांत्रिक) : या पदासाठी उमेदवाराकडे अभियांत्रिकीची पदवी किंवा विज्ञान शाखेतील पदवी हवी.
  • सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ :  उमेदवाराने 55 टक्के गुणांसह B.com किंवा CA/ICWA किंवा MBA ची पदवी हवी.
  • उर्वरित पदे : इतर उर्वरित पदांसाठी उमेदवार पदवीधर किंवा समतुल्य असावा.

परीक्षा कधी असणार ?

या रिक्त 303 जागांसाठीच्या परीक्षा या पुढील वर्षी 20, 21 आणि 22 जानेवारी 2024 मध्ये होतील.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here