Monsoon assembly session : काका-पुतण्यात जुंपली, अखेर उदय समंतांची मध्यस्थी फळाला आली

0
44

Monsoon assembly session : महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनाचा आजचा सहावा दिवस. यंदाच अधिवेशन देखील दरवर्षीच्या अधिवेशनांप्रमाणेच वादळी ठरत आहे. यातच आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड एमआयडीसीच्या विविध मागण्यांसाठी विधानभवन परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आंदोलन केलं.

रोहित पवार यांनी आंदोलन पुकारताच भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासह विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी रोहित पवार यांची भेट घेत समजूत काढण्याचा प्रयत्न केला. कर्जत जामखेड एमआयडीसीचा मुद्दा या आंदोलनामुळे विधानसभेमध्ये देखील उचलून धरण्यात आला. मात्र या मुद्द्यावर अशा प्रकारे आंदोलन करणं योग्य नाही असं म्हणत अजित पवार यांनी रोहित पवारांवर निशाणा साधला.

अजित पवार म्हणाले की, आमदार रोहित पवार यांनी 22 जूनला दिलेलं पत्र 1 जुलै 2023 ला शासनाला मिळाले. कर्जत जामखेड एमआयडीसी बाबत हे पत्र होते. यावर येत्या पावसाळी अधिवेशनात सर्व संबंधितांसोबत बैठकीचे आयोजन करून निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे सुरू असलेले उपोषण, आंदोलन मागे घेण्यात यावं असं कळवण्यात आलं होतं. मंत्री महोदयांनी पत्र दिले, अधिवेशन संपले नाही आता दुसरा आठवडा सुरू झालाय लोकप्रतिनिधींनी मंत्र्यांनी व विभागाच्या अधिकाऱ्यांनी पत्र दिल्यानंतर त्याची गंभीर दखल घ्यायला हवी होती. अशा रीतीने आंदोलनाला बसणं उचित नाही असं म्हणत अजित पवारांनी रोहित पवार यांना फटकारल आहे.

दरम्यान यावर आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रत्युत्तर दिल आहे. अजित दादा धडाडीचे निर्णय घेणारे नेते म्हणून आपली ओळख आहे. एमआयडीसीचा विषय आजचा नसून केवळ अधिसूचना काढून पुढील कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी गेल्या वर्षभरापासून मी वारंवार मुख्यमंत्री, उद्योगमंत्री यांना भेटून विनंती केली आहे. निवेदन देखील दिले आहेत. विधानसभेतही आवाज उठवला, परंतु राजकीय दबावाला बळी पडत सरकारने प्रत्येक वेळी माझी आश्वासनांवर बोळवण केली. त्यामुळे नाईलाजाने मला उपोषणाला बसण्याचा निर्णय घ्यावा लागला. उपमुख्यमंत्री म्हणून आपणच या कामी लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावला तर माझा संपूर्ण मतदारसंघ कायमस्वरूपी आपला आभारी राहील.

मंत्री उदय सामंतांनी दिल आश्वासन ; पवारांनी आंदोलन घेतलं मागे.

एमआयडीसी संदर्भातील निर्णयासाठी लवकरात लवकर बैठक बोलवण्यात येईल. अस आश्वासन रोहित पवारांना दिलं होतं. अधिसूचना काढण्यासाठी उद्योग विभाग सकारात्मक असून तातडीने निर्णय घेण्यात येईल. रोहित पवारांच आंदोलन त्यांच्या मतदारसंघासाठी होतं. जेव्हा लोकप्रतिनिधी अशा पद्धतीने आंदोलन करतात तेव्हा सरकारने त्याची नोंद घ्यायची असते. यामुळे मी त्यांना जाऊन भेटलो विनंती देखील केली, त्यांनी माझ्या विनंतीला मान दिला आणि आंदोलन मागे घेतलं असल्याचं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here