ModiRaj | उद्या प्रचार संपणार, आज वातावरण तापणार; दोन्ही गटांचे ‘महाशक्तिप्रदर्शन’

0
31
ModiRaj
ModiRaj

ModiRaj | लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्याचे मतदान २० मे रोजी होणार आहे. त्यामुळे उद्या १८ मे हा प्रचाराचा शेवटचा दिवस असणार आहे. मुंबईतील सहा अनो राज्यातील १३ जागांवर या टप्प्यात मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज इंडिया आघाडी आणि राज्यातील महायुती या दोन्ही गटांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे. (ModiRaj)

ModiRaj | महायुतीची सभा 

महायुतीच्या गोटात आज प्रथमच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे यांना महाराष्ट्राला एकाच मंचावर तेही शिवतीर्थावर बघायला मिळणार आहे. यासाठी मुंबईसह राज्यभरात ‘मोदीराज’ या आशयाचे बॅनरही लावण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज महायुतीची संध्याकाळी पाच वाजता सांगता सभा पार पडणार आहे. या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि रिपाईचे रामदास आठवले हे उपस्थित असणार आहेत. (ModiRaj)

Raj Thackeray | ‘मोदी नसते तर, राम मंदिर झाले नसते’; ठाकरेंकडून मोदींवर ‘कौतुकसुमने’..?

इंडिया आघाडीचीही सभा

आज महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचीही आज सभा होत असून, या सभेला इंडिया आघाडीचे नेते सर्व पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल या प्रमुख नेत्यांची उपस्थिती असणार आहेत. मात्र, या सभेला राहुल गांधी उपस्थित राहणार नाहीत.इंडिया आघाडीची ही सभा आज संध्याकाळी सहा वाजता मुंबईतील बीकेसी मैदानावर होणार आहे. (ModiRaj)

इंडिया आघाडीच्या या जाहीर सभेला काँग्रेस नेते राहुल गांधी उपस्थित नसतील. कारण राहुल गांधी हे रायबरेली मतदार संघातून निवडणूक लढवत असून, तिथेही २० मे रोजी मतदान होणार आहे. यामुळे आजच्या या सभेला राहुल गांधी येणार नाहीत. तसेच उद्या १८ मे रोजी इंडिया आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद देखील होणार आहे.

PM Modi In Nashik | आमच्या काळात सर्वाधिक कांदा निर्यात; माझे शेतकरी मला विसरणार नाही


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here