Bharat aata | मोदी सरकारची नवी भेट, सर्वसामान्यांसाठी ‘भारत आटा’ लॉन्च

0
17

Bharat aata | ऐन दिवाळीच्या तोंडावर केंद्र सरकारकडून सर्वसामान्यांसाठी खास योजना सुरू करण्यात आली आहे. दिवाळीपूर्वी सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने ‘भारत आटा’ या नावाने एक ब्रँड देशभरात आणला आहे. ह्या गव्हाच्या पीठाची किंमत २७.५० रुपये प्रतिकिलो इतकी असू, याच दराने देशभरात विक्री सुरू आहे. नाफेड, एनसीसीएफ व केंद्रीय भंडार या सहकारी संस्थांच्या माध्यमातून देशभरातील ८०० मोबाईल व्हॅन व  २,००० हून अधिक दुकानांमधून ‘भारत आटा’ची विक्री केली जात आहे.

 माहितीनुसार, सध्याच्या ३६ ते ७० रुपये किलोच्या बाजारभावापेक्षा गुणवत्तेवर व स्थानानुसार ‘भारत आटा’चे अनुदानित दर हे कमी आहेत. फेब्रुवारीमध्ये, सरकारने किंमत स्थिरीकरण निधी योजनेंतर्गत काही शहरांतील दुकानांमध्ये या सहकारी संस्थांमार्फत १८,००० टन ‘भारत आटा’ची २९.५० रुपये प्रति किलो या दराने प्रायोगिक विक्री केली होती.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ‘भारत आटा’च्या १०० मोबाईल व्हॅनला हिरवा कंदील दाखवून केंद्रीय अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री पियुष गोयल हे म्हणाले, ‘आम्ही ह्या गव्हाच्या पीठावर अनेक चाचण्या घेतल्या व त्यात आम्हाला यश आल्याने आम्ही ही सेवा लोकांपर्यंत पोहोचवत आहोत. २७.५० रुपये प्रति किलो या दराने संपूर्ण देशात हे गव्हाचे पीठ उपलब्ध आहे.

ते म्हणाले की, ‘चाचणीच्या वेळी गव्हाच्या पीठाची विक्री ही कमी होती. कारण त्याची काही मोजक्या स्टोअर्समधूनच किरकोळ स्वरूपात विक्री सुरू होती. यामुळे, यावेळी या उत्पादनाची विक्री चांगली होईल. कारण देशभरातील तीन एजन्सीच्या ८०० मोबाईल व्हॅन व २,००० दुकानांमधून ह्या उत्पादनाची विक्री केली जात आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here