Mns – shivsena aliens? : बाळासाहेबांचे दोन्ही वाघ लवकरच एकत्र येणार?

0
24

Mns – shivsena aliens?एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नुकतीच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेले अजित पवार एकत्र आल्यानं महाराष्ट्रातील राजकारण पुरतच ढवळून निघाल आहे. यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट एकत्र येणार असल्याच्या चर्चा रंगत असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अभिजीत पानसे यांनी नुकतीच मातोश्री वर जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांची भेट घेतली असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून समोर येत आहे. यामुळे ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत

महाराष्ट्रातील राजकारण हे नेहमीच या न त्या कारणाने देशभरात गाजत असतं. गेल्या वर्षभरापासून पक्षांतर्गत कलह आणि पक्ष फोडीमुळे महाराष्ट्रातील राजकारणाच्या चर्चा या देशभरात रंगत आहेत.Mns – shivsena aliens? एकीकडे फोडाफोडीचे राजकारण सुरू असताना दुसरीकडे ठाकरे बंधूंनी मराठी माणसांची अस्मिता टिकवण्यासाठी एकत्र यावं अशी भावनिक साद मनसे पदाधिकाऱ्यांकडून काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीदरम्यान घालण्यात आली होती. तर मुंबईत थेट फलकबाजी देखील याबाबत करण्यात आली होती. मात्र याला दोन्ही ठाकरें कडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती. यातच आता शिवसेना मनसे एकत्रित येण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्याची माहिती विश्वासनीय सूत्रांकडून देण्यात आली आहे. Mns – shivsena aliens?आज अभिजीत पानसे युतीचा प्रस्ताव घेऊन मातोश्रीवर दाखल झाले असल्याचं बोललं जात आहे. तर सध्याच्या राजकीय घडामोडींमध्ये जर ठाकरे बंधू एकत्र आले तर राज्यात पुन्हा एक मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे त्यांचा आक्रमकपणा त्यांची ओळख आहे. तर याउलट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शांत व स्मितभाषी नेतृत्व असल्याचं सर्वश्रुत आहे. त्यामुळे हे दोन्ही ठाकरे बंधू आगामी लोकसभा विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकत्रित आले तर राजकारणाचं चित्र पूर्णतः बदलेल अशी भावना जनसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे.Mns – shivsena aliens?

दोन्ही बंधू एका पक्षामध्ये नसले तरी मात्र त्यांच्यामध्ये कौटुंबिक संबंध चांगले असल्याचे नेहमीच बघायला मिळतं. दोघेही एकमेकांच्या बिकट प्रसंगी धावून जात असल्याच देखील अनेकदा बघायला मिळाल आहे.Mns – shivsena aliens? 2019 मध्ये जेव्हा उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्या वेळेला शपथविधी कार्यक्रमाला राज ठाकरे व त्यांच्या आई सहपरिवार उपस्थित होत्या. यामुळे या दोन्ही बंधूंमध्ये कोणतेही कौटुंबिक मतभेद नसल्याचं अधोरेखित झालं आहे.

*दोन्ही ठाकरे एकत्र आल्यास महाराष्ट्रला मराठी माणूस एकवटेल?*
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून शिवसेनेला मिळालेला वारसा हा हिंदुत्वाचा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राजकीय घडामोडींमध्ये मराठी माणूस होरपळून निघत आहेत. यातच सत्ता गेल्यापासून उद्धव ठाकरे यांना मिळत असलेली सहानुभूती आणि इतर पक्षांसह शिवसेने मध्ये पडलेली फुट तसेच मनसेचा मराठी अस्मिता आणि हिंदुत्वाचा अजेंडा पूर्ण व्हावा यासाठी या दोन्ही भावांनी एकत्र येणं गरजेचं असल्याचं सर्वसामान्यांचे मत आहे. यामुळे शिवसेनेपासून दूर गेलेला मतदार पुन्हा एकत्र येईल आणि दोन्ही बंधूंच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहून मराठी अस्मिता पूर्वत होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.Mns – shivsena aliens?

दुसरीकडे राज ठाकरे यांना मोठा वर्ग राज्यभरात आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा चाहता वर्ग मोठा असल्याने दोनही बंधू एकत्र आले.Mns – shivsena aliens? तर ही युती अनेकांना मोठा धक्का देणारी ठरेल हे दोघे बंधू सोबत एकत्र येणार की नाही हे जरी अजून गुलदस्तात असलं तरी मात्र त्यांनी एकत्र यावं यासाठी प्रयत्न होत असल्याचं काही घडामोडींवरून लक्षात येत आहे.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here