मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे घरातून पुण्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. 1 मे महाराष्ट्र दिनाला औरंगाबाद मध्ये मनसेची जंगी सभा होणार आहे. पुण्याकडे जाताना नवी मुंबईपर्यंत ठिकठिकाणी त्यांचे जंगी स्वागतासाठी कार्यकर्ते उभे आहेत. आज पुण्यात येत असल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे.
राज्यात सध्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राजकारण तापले आहे. अशात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये 1 मे रोजी सभा जाहीर केली होते.मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुणे दौऱ्यासाठी मुंबईवरुन रवाना झाले आहेत. याकरिता राज ठाकरेंसोबत मुंबईसह पुण्यातील कार्यकर्त्यांच्या गाड्यांचा ताफा आहे. तसेच औरंगाबाद या सभेसाठी राज ठाकरे यांना अटी आणि शर्तींवर पोलिसांनी परवानगी दिली आहे.
राज्यात काही दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची औरंगाबाद येथे 1 मे रोजी होणारी सभा चांगलीच चर्चेत आली आहे. या सभेला अयोध्येतून 2500 कार्यकर्ते येणार असल्याची माहिती मनसेच्या नेत्यांनी दिली आहे. संपूर्ण राज्याचं या सभेकडे लक्ष लागून आहे. मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे राज्यातील राजकारण चांगलेच ढवळून निघाले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम