मशिदींवरील भोंग्यावरुन राज्यात तणावाचं वातावरण निर्माण झाला आहे. मनसेने आक्रमक पवित्रा घेतला होता. यावरून मनसेच्या नेत्यांवर होत असलेल्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आज गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील यांची भेट घेतली आहे. या भेटीनंतर मनसे कार्यकर्त्यांची धरपकड थांबेल का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
4 मे रोजी मनसे कार्यकर्त्यांनी भोंग्याविषयी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. कारवाईमुळे मनसेचे दोन प्रमुख फायरब्रँड नेते संदीप देशपांडे व संतोष धुरी अद्याप नॉट रिचेबल आहेत. जवळपास 28 हजार मनसे कार्यकर्त्यांवर कारवाई करण्याबाबतच्या नोटीस देण्यात आली आहेत.
राज ठाकरेंनी काल मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले होते. या पत्राच्या पार्श्वभूमीवर ही भेटीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नांदगावकरांनी काल त्यांनी पोलीस आयुक्त आणि गुन्हे शाखेचे पोलीस सहआयुक्त यांची देखील यासंबंधी भेट घेतली होती. आज सकाळी 10 वाजता बाळा नांदगाव करांनी गृहमंत्र्यांची भेट घेतली आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांवरील कारवाईवर चर्चा झाल्याचे समजते. भेटीनंतर बाळा नांदगावकर राज ठाकरे यांच्या भेटीकरता रवाना झाले.
राज ठाकरे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले यावर वळसे-पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ज्या मनसे नेत्यांवर गुन्हे दाखल झालेले आहेत, त्यांनी ताबडतोब पोलिसांकडे शरण आले पाहिजे, अशी प्रतिक्रिया काल राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली होती. आज बाळा नांदगावकर थेट दिलीप वळसे-पाटील यांच्या भेटीला गेल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम