– राम शिंदे
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागातील अडसरे फळवीर वाडी भागात ३१ ऑगस्ट रोजी रात्रीच्या वेळी भयंकर जोरदार पावसासह ढगफुटी झाली या ढगफुटीत फळवीर वाडीतील पाझर तलाव रात्री अकरा वाजेच्या दरम्यान अचानक फुटला व काही तासांभरात होत्याच नव्हतं झालं.
या दुर्घटनेत या भागातील सर्व शेतकऱ्यांच्या जमिनी शेती पिकांसह वाहून गेल्या रस्ते खचले विहिरी बोअरवेल जमीनदोस्त झाल्या यात शेतकऱ्यांचे न भरून येणारे अतोनात नुकसान झाल्याने या घटनास्थळी आजी माजी आमदार, खासदार यांच्यासह पालकमंत्री गिरीश महाजन हे पाहणी दौरा करून निघून गेले परंतु या घटनेतील नुकसानग्रस्त शेतकरी कुटुंबियांना अद्याप पर्यंत कोणतीही मदत झाली नाही अथवा कोणतीही मदत पोहचली नाही.
या परिस्थितीचा आढावा घेत मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांनी आपल्या मनसे पदाधिकाऱ्यांसह घटनास्थळी जात पाहणी केली व येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्यांना दिलासा दिला. मनसेच्या वतीने येथील नुकसानग्रस्तांच्या कुटुंबियांना जीवनावश्यक किट तांदूळ व येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शालेय विद्यार्थ्यांना प्रत्येकी सहा सहा वह्या सह शैक्षणिक साहित्याचे दोन दिवसांत वाटप करण्याचे जाहीर केले. व या नुकसंग्रस्तांना तात्काळ मदत मिळावी त्यांची नुकसानभरपाई मिळावी यासाठी मनसेच्या वतीने शासन स्तरावर प्रयत्न केल्या जाईल असा दिलासादायक आधार मनसेच्या वतीने जिल्हाध्यक्ष अंकुश पवार यांनी येथील शेतकऱ्यांना दिला. मनसे कार्यकर्ता आढावा बैठक व अति पावसामुळे झालेले नुकसान पाहणी दौऱ्यावर ते आले होते.
यावेळी नुकसान पाहणी दौऱ्यात मनसेचे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, जिल्हा सरचिटणीस रतनकुमार इचम,जेष्ठ नेते डॉ युनूस रंगरेज, मनसे विद्यार्थी सेना उप जिल्हाध्यक्ष आत्माराम मते, तालुकाध्यक्ष प्रताप जाखेरे, तालुका संघटक अंबादास पाबळकर,विठ्ठल वारुंगसे, गट प्रमुख विजय कोरडे, विजय गाढवे, राजेश गाढवे, अशोक गाढवे, सागर गाढवे, मंगेश गाढवे, जालिंदर करवंदे, नितीन गोडे, रोहित कदम, अमित जाखेरे आदींसह बहुसंख्य मनसे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
“इगतपुरी तालुक्यातील फळवीर वाडीतील बंधारा फुटल्याने शेतकऱ्यांचे ,हे प्रचंड नुकसान झाले असून ही न भरून येणारी नुकसान आहे.मनसेच्या वतीने शेतकऱ्यांना मंदतरुपी न्याय देण्यासाठी प्रयत्नशील राहील.”
– अंकुश पवार जिल्हाध्यक्ष मनसे नाशिक
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम