महापालिका निवडणुकीआधीच राज ठाकरे अॅक्शन मोडवर

0
35
mns

मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे पायाच्या ऑपरेशननंतर पुन्हा एकदा अॅक्शन मोडवर आले असून, त्याची सुरुवात आज बाप्पाच्या दर्शनाने केली आहे.

गेली काही महिने सत्तेच्या राजकारणात कधी नव्हे इतके महत्त्व राज ठाकरेंना आले आले. अनेक भाजप नेते राज यांच्या भेटीला जात असताना आज राज ठाकरे ह्यांनी थेट बाप्पाचे दर्शन घेतले. ठाकरेंनी सहकुटुंब सिद्धिविनायक गणपती, तसेच वरळी गणेशोस्तव मंडळाच्या गणपतींचे दर्शन घेतले.

राज ठाकरेंवर काही महिन्यांपूर्वी ऑपरेशन झाले असून ते घरातूनच अनेकदा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आले. तर त्यांच्या अनुपस्थितीत अमित ठाकरे हे राज्यात विविध दौरे करत राहिले. आता राज ठाकरे हे पुन्हा अॅक्शन मोडवर आल्याने मनसेमध्ये उत्साह संचारला आहे. त्यातच महापालिका निवडणूक पाहता त्यांनी आतापासूनच तयारीला सुरुवात केली आहे. त्याचा श्रीगणेशा म्हणून ठाकरेंनी आज बाप्पांचे दर्शन घेतले.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here