Nashik News | नांदगाव, चांदवड-देवळा तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यासाठी आमदार मैदानात…

0
48

Nashik News | यावर्षी पावसाने दडी मारल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. अनेक ठिकाणी दुष्काळ जाहीर करण्यात यावी अशी मागणी होत आहे. दरम्यान, नांदगाव तालुक्यातही दुष्काळ जाहीर करण्याची मागणी मतदार संघाचे आमदार सुहास कांदे यांनी केली आहे. सरकारने नांदगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर केला नाही तर, केंद्रासह राज्य सरकार विरोधात थेट न्यायालयात जाण्याचा इशारा देत  शिंदे गटातील आमदारानेच सरकारला घरचा आहेर दिला आहे. 

नाशिकच्या येवला तालुक्यापेक्षा नांदगाव तालुक्यात भीषण परिस्थिती असल्याचा दावाही आमदार सुहास कांदे यांनी यावेळी केला. तसेच नांदगावमध्ये दुष्काळ जाहीर न झाल्यामुळे नांदगाव तालुक्यावर अन्याय झाल्याची भावना शेतकरी तथा नागरिकांमध्ये आहे. दरम्यान, चांदवड आणि देवळा ह्या तालुक्यांतही दुष्काळ तातडीने जाहीर करावा, अशी मागणी मतदारसंघाचे भाजप आमदार डॉ. राहुल आहेर यांनी केली आहे. नाहीतर,  तालुक्यातील जनतेसोबत आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

राज्य सरकारने राज्यातील ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला आहे. यात नाशिक जिल्ह्यातील तीन तालुक्यांचा समावेश आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव, तर छगन भुजबळ यांच्या येवला व सिन्नर तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे.

JEE Main 2024 Updates | सत्र 1 साठी कसा करावा अर्ज? जाणुन घ्या संपुर्ण माहिती

४० तालुक्यात दुष्काळ

राज्यात यावर्षी कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली दुष्काळी परिस्थिती लक्षात घेता येणाऱ्या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यास राज्य मंत्रिमंडळाने संमती दिली. त्यानुसार दुष्काळी परिस्थितीत आवश्यक मदत करण्याबाबत तातडीने केंद्राला विनंतीही करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

उर्वरित तालुक्यांमध्ये जेथे कमी पाऊस झाला आहे. तिथे दुष्काळसदृष्य परिस्थिती जाहीर करून या मंडळांकरिता योग्य सवलती देण्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीने लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तथा उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत.

तालुक्यात दुष्काळ ग्रस्त परिस्थिती आहे. शासनाच्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या सर्व निकषात आमचा तालुका बसतो. माझं याविषयावर मुख्यमंत्र्यांसोबत बोलण झालं आहे. तसे पत्रही मी त्यांना दिले आहे. आणि त्यांनी मला मागणी पूर्ण करण्याबाबत आश्वासनही दिले आहे.

आमदार सुहास कांदे (नांदगाव विधानसभा मतदार संघ)

नाशिककरांनो दिवाळीत फटाके फोडताना जरा सांभाळून; नाशिक जिल्हा प्रशासनाकडून नियमावली जाहीर

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here