Suhas Kande | आ. कांदे विरोधी पक्षांच्या टार्गेटवर…

0
35

Suhas kande |  मराठा अरक्षणानंतर आता दुष्काळाच्या विषयावरून राज्यात राजकारण सुरू आहे. शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत आपल्या मतदार संघाचे नाव नसल्याने आता नाशिक जिल्ह्यात वातावरण तापले आहे. या विषयावर आमदार सुहास कांदेंना विरोधकांकडून अडचणीत आणण्याचा प्रयत्न आहे.

आमदार सुहास कांदे यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट आज मैदानात उतरणार आहे. गुरुवारी या विषयावर राष्ट्रवादीने राज्य सरकारचा निषेध करत आंदोलनही केले होते. राज्याच्या विविध भागात यंदा दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. त्यामुळे आता या प्रश्नावर विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत.
मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू झाल्याने हा विषय किंचित मागे पडला होता. पण, आता मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतल्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात दुष्काळाच्या विषयावर शेतकरी वर्गात खदखद निर्माण होण्याची शक्यता आहे.
या विषयामुळे नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक चर्चेत नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास कांदे आणि त्यांचा नांदगाव तालुका होता. पालकमंत्री दादा भुसे व आमदार कांदे हे एकाच गटातले नेते आहेत. पण, छगन भुजबळ व आ. कांदे यांच्यात खदखद असल्याचे चित्र आहे. आमदार कांदे यांनी यापूर्वीच पावसाने मारलेली दडी, पिकांची आणेवारी तसेच पाणी टंचाई या तिन्ही निकषांत नांदगाव तालुका बसतो, असा दावा केला आहे.

दुष्काळाच्या झळा ह्या तालुक्याला मोठ्या प्रमाणात बसत आहेत. पिण्याच्या पाण्याची टंचाई अनेक भागात भासत आहे. आतापासूनच अनेक गावांना टँकरने पाणी पुरविले जात आहे.

त्यामुळे पीकविम्याची भरपाई, पाणी, रोजगार आणि दुष्काळाच्या झळा ह्या राज्यातील समस्यांवर काल राष्ट्रवादी काँग्रेसने मोठे आंदोलन केले. दरम्यान, आज शिवसेना ठाकरे गट याविषयावर आंदोलनात उतरणार आहे. त्यामुळे विरोधी पक्षांनी आमदार सुहास कांदे यांना ह्या विषयावरून घेरण्याची चांगलीच तयारी केली असल्याचे दिसत आहे.

Crime news | यात्रेत मजा करण्यासाठी केली चोरी…


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here