MLA Disqualification | एकनाथ शिंदेंना हटवण्यासाठी विश्वासुंनीच केल्या होत्या सह्या..?

0
31
MLA Disqualification
MLA Disqualification

MLA Disqualification |  शिवसेना आमदार अपात्रता (MLA Disqualification) प्रकरणाची सुनावणी ही आता नागपूर येथे सुरू असून आज दोन सत्रांत सुनावणी पार पाडणार आहे.  आजच्या ह्या पहिल्या सत्रातील सुनावणीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांनी शिवसेना शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांची साक्ष घेतली आहे.

(दि. २१ जून २०२२) रोजी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा ह्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत पक्षाच्या आदेशानुसार किती आमदार उपस्थित होते? ह्या उलट तपासणीच्या दरम्यान वारंवार विचरण्यात येणाऱ्या प्रश्नावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने शिंदे गटाच्या साक्षीदाराला २१ जून २०२२ रोजी च्या पक्षाच्या बैठकीची अटेंडन्स शीट दाखवली आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे गटाकडून प्रतिज्ञापत्रात दाखल करण्यात आलेल्या ह्या अटेंडंटशिप नुसार सुनील प्रभू यांच्याकडून ही व्हीप जारी करून २१ जून २०२२ च्या बैठकीसाठी हजर राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या(MLA Disqualification)

Child Marriage | पोलिस झाले वऱ्हाडी; समजूत काढत बालविवाह रोखला

ह्या २१ जून २०२२ रोजी झालेल्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत एकूण २३ आमदारांनी उपस्थिती दर्शवली होती तसेच त्यांच्या अटेंडन्स शीट वरील सह्या ह्या एकनाथ शिंदेंबरोबर गेलेल्या शिवसेना शिंदे गटातील त्या आमदारांनीच केलेल्या होत्या का? असा सवाल ही शीट दाखवत उद्धव ठाकरे गटाकडून विचारला जाणार आहे

दरम्यान, ह्या कथित बैठकीत सध्या शिवसेना शिंदे गटात असलेले मंत्री गुलाबराव पाटील, संजय राठोड, संतोष बांगर, मंत्री दादा भुसे, दिलीप लांडे, मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर, योगेश कदम, मंत्री उदय सामंत, मंत्री दीपक केसरकर इत्यादि हे सर्व आमदार यावेळी उपस्थित होते. आणि यांच्या सह्या देखील ह्या बैठकीच्या अटेंडंटस शीटवर आहेत. (MLA Disqualification)

याच बैठकीत आपण पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहोत आणि पक्षाचे गटनेता म्हणून एकनाथ शिंदे यांना ह्या गटनेते पदावरून हटवण्याबाबतचा प्रस्ताव हा यावेळी मांडण्यात आला होता. ज्याला ह्या आमदारांनी अनुमोदन दिले. आता याच मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे वकील हे उलट तपासणी मध्ये प्रश्न तसेच उपप्रश्न विचारून शिंदे गटाला अडचणीत टाकण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. (MLA Disqualification)

Cafe Raid | कॅफे बनले अश्लील चाळ्यांचे अड्डे; पोलिसांची धडक कारवाई

दिलीप लांडे यांनी आपल्या साक्ष मध्ये यावर केलेली ही सही आपलीच असल्याचं कबूल केलं आहे. पण त्या मध्ये वरती लिहिण्यात आलेला पक्षादेश क्रमांक हा आमच्या सह्या घेतल्यानंतर घेण्यात आलेला आहे ,असं दिलीप लांडे यांनी यावेळी म्हटलं आहे. (MLA Disqualification)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here