MLA Disqualification: आमदार अपात्रता प्रकरण निकालाच्या तारखा जाहीर..!

0
20

MLA Disqualification: बहुचर्चित शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी (MLA Disqualification Case) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या न्यायाधिकरणाने सुनावणीच्या कामकाजाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार, ६ ऑक्टोबरपासून युक्तिवादाला सुरुवात होणार असून, प्रत्यक्ष निकाल जाहीर होण्यास ३ महिन्यांहून अधिक काळ लागण्याची शक्यता आहे.

Ajit pawar: भाजप मधल्याच काही लोकांना अजित पवार मुख्यमंत्री म्हणून नको आहेत काय ?

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या न्यायाधिकरणाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार, ६ ऑक्टोबर २०२३ रोजी याचिकाकर्ते उद्धव ठाकरे गटातर्फे २३ सप्टेंबर रोजी दाखल करण्यात आलेल्या अतिरिक्त प्रतिज्ञापत्रावर एकनाथ शिंदे गटाचे वकील त्यांचे उत्तर दाखल करतील. १३ ऑक्टोबर २०२३ रोजी अपात्रतेबाबतच्या सगळ्या याचिकांची सुनावणी एकत्र व्हावी या उद्धव ठाकरे गटातर्फे मागणी करण्यात आलेल्या अर्जावर युक्तिवाद होतील. १३ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर २०२३ दरम्यान अपात्रतात सुनावणीबाबत विधानसभा सचिवालयात दाखल असलेल्या कागदपत्रांची, आदेशांची पाहणी करण्यासाठी, कागदपत्रे शोधण्यासाठी दोन्ही पक्षांच्या वकिलांना संधी देण्यात येईल. २० ऑक्टोबर २०२३ रोजी अपात्रतेबाबतच्या सगळ्या याचिकांची सुनावणी एकत्र व्हावी, या उद्धव ठाकरे गटाच्या अर्जावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निर्णय जाहीर करतील. दाखल झालेल्या कागदपत्रांपैकी कोणते डॉक्युमेंट्स ऍडमिट करायचे व कोणते नाकारायचे यावर २७ ऑक्टोबर २०२३ रोजी दोन्ही पक्ष आपापले म्हणणे सादर करतील.

• नोव्हेंबर महिन्यातील कामकाज असे होणार….

• ६ नोव्हेंबर २०२३ अपात्रतेबाबत निर्णय घेतांना काय मुद्दे विचारात घेतले पाहिजेत, यावर दोन्ही पक्षांनी आपले लेखी म्हणणे सादर करावे व एकमेकांना त्याच्या कॉपीज द्याव्यात.

• १० नोव्हेंबर २०२३ अपात्रतेबाबत निर्णय घेतांना काय मुद्दे विचारात घेऊन नक्की केले पाहिजेत यावर विधानसभा अध्यक्ष दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकतील.

• २० नोव्हेंबर २०२३ प्राथमिक तपासणी घेण्यासाठी दोन्ही पक्षांनी त्यांच्या साक्षीदारांची यादी व प्रतिज्ञापत्र दाखल करावेत.

• २३ नोव्हेंबर २०२३ या तारखेपासून उलट तपासणी सुरू होईल आणि आवश्यकतेनुसार तसेच दोन्ही – पक्षांच्या वकिलांच्या सोयीनुसार तारखा देण्यात येतील. शक्य असेल त्याप्रमाणे उलट तपासणी आठवड्यातून दोनदा घेण्यात येईल.

• अंतिम युक्तिवाद – सगळ्यांचे म्हणणे पुरावे ऐकून घेण्याची वरील सर्व प्रक्रिया संपल्यावर दोन आठवड्यानंतर अंतिम सुनावणीसाठी तारीख ठरवली जाईल.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here