MLA Aher: : केंद्र सरकारने कांदा निर्यात शुल्कात 40 टक्के वाढ करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर अन्याय केला आहे. या शुक्ल वाढीमुळे कांद्याचे भाव कोसळून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसणार असून ,या निर्णयाच्या विरोधात राज्यभरात आंदोलन होत आहेत, विशेष म्हणजे चांदवड देवळा मतदार संघातीत मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादक शेतकरी आहेत, देवळा तालुक्यात लोहोणेर येथे महामार्गावर माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल यांच्या उपस्थितीत रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. त्यानंतर चांदवड येथे देखील आंदोलन छेडण्यात येणार आहे. (MLA Aher)
Keda aher bday: ‘थोडा संयम ठेवा, नवीन अध्याय सुरू होतोय……; नानांचा सूचक इशारा ?
आंदोलन होत असताना राजकीय नेत्यांची चांगलीच गोची झाली. सत्तेत असल्याने शेतकऱ्यांची बाजू घ्यावी की मतदार राज्याची ही मोठी कसरत करावी लागली. केंद्रिय राज्यमंत्री डॉ भारती पवार यांना देखील मोठ्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यानंतर सर्वच लोकप्रतिनिधींना आपली भूमिका मांडावी लागली. जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी तर थेट कांदा परवडत नसेल तर खाऊ नका मात्र शेतकऱ्यांना दोन पैसे मिळू द्या अशी जाहीर भूमिका घेवून शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहिले, तसेच मंत्री छगन भुजबळ यांनी देखील सरकारवर आसूड ओढले मात्र त्याचवेळी सर्वाधिक कांदा पिकणाऱ्या चांदवड देवळा मतदार संघाचे आ. राहुल आहेर मात्र कुठेही प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसले नाहीत. आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीत असल्याचे त्यांनी सांगितले मात्र जाहीर आणि रोकठोक भूमिका का घेत नाही हे देखील महत्वाचे आहे. नेहमीच सावध आणि सोभर भूमिकेत असणारे आ. राहुल आहेर किमान कांदा प्रश्नावर तरी सडेतोड भूमिका घेणार का हे बघणे महत्वाचे आहे. तालुक्याच्या दृष्टीने दादा नानांपेक्षा चांगले आहेत असा म्हणणारा वर्ग मोठा आहे मग नेमक भूमिका घेण्याच्या वेळेस शांत असणे, शेतकरी संकटात असताना त्यांच्यासोबत उभे नसणे यालाच चांगला गुण म्हणत असतील का हा पण प्रश्न आहेच.
शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी केंद्र व राज्य सरकार प्रयत्नशील
राज्यात दोन दिवसापासून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. यावर सरकारने तोडगा काढला आहे यातून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. केंद्र सरकारने २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांचे हित यात जोपासण्यात आले आहे. लवकरच नाशिक आणि अहमदनगर येथे विशेष खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार आहे. यातून राज्यातील कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळणार आहे. शेतकर्यांच्या हितासाठी केंद्रातील तसेच राज्यातील सरकार सातत्याने प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेवून व्यवहार सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करण्याचे मी आवाहन करतो.
– दादाजी भुसे
पालकमंत्री नाशिक
मतदार संघात आग लागली असून शेतकरी पेटला आहे. विविध ठिकाणी झालेल्या आंदोलनात आंदोलक कर्त्यां शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात घोषणाबाजी करत सरकारचा निषेध व्यक्त केला . केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड प्रमाणात नुकसान होते असुन या धोरणांचा निषेध करण्यासाठी माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी दि 24 रोजी चांदवड येथील बाजार समितीच्या आवारासमोर मुंबई आग्रा महामार्गावर भव्य रास्तारोको आंदोलन छेडण्यात येणार असून यावेळी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्नवयक कुबेर जाधव यांनी केले .
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम