Skip to content

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळविण्यासाठी करा पालकमंत्री कार्यालयाशी संपर्क


नाशिक: जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत मिळत असते मात्र जनतेला माहिती नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. रुग्ण योजनेच्या निकषात बसत असल्यास त्यांनी नाशिक पालकमंत्री कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन नाशिक जिल्हा पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विविध शस्त्रक्रिया, आजारांवरील उपचारांसाठी मदत दिली जाते. ही प्रक्रिया अतिशय सोपी असली तरी अनेकांना अडचणी येत असतात अशावेळी रुग्णांनी नाशिक येथील संभाजी चौक उंटवाडी रोड याठिकाणी जावून आपले कागदपत्रे जमा करून मदत मिळवू शकता अशी माहिती यावेळी दिली. यासाठीचा अर्ज कुठे मिळतो, तो कसा भरायचा किंवा तो मुख्यमंत्री कार्यालयातूनच घ्यावा का, अशा विविध शंका सर्वसामान्यांच्या मनात असतात. सर्वसामान्य नागरिकांची ही शंका दूर करण्यासाठी पालकमंत्री कार्यालया मार्फत स्वतंत्र वैद्यकीय कक्ष स्थापन केला असून यातून गेल्या चार महिन्यात शेकडो रुग्णांना मदत झाली आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून नाशिक जिल्ह्यासाठी आतापर्यंत 4 कोटी 55 लाख रुपये मदत झाली आहे. रुग्णांना मदत मिळविण्यासाठी पालकमंत्री कार्यालय नाशिक येथील कार्यालयाशी संपर्क साधून मदत मिळवावी असे आवाहन करण्यात आले आहे. – +918329005481

मुख्यमंत्री सहाय्यता निधी- 1) हृदयदरोग २) मेंदूरोग, 3) नवजात बालके 4) मूत्रपिंड प्रत्यारोपण प्रत्यारोपण, 5) यकृत प्रत्यारोपण, 6) कर्करोग, 7) अपघात, 8) डायलिसिस, 9) हृदयप्रत्यारोपण, 10) CVA व 11) Bone Marrow Transplant या 11 गंभीर आजारांसह एकूण 20 आजारांवर उपचार मिळण्यास मदत होते. उपरोक्त तीनही योजनांचा लाभ मिळू न शकणाऱ्या आणि राज्यातील या योजनेत नोंदणीकृत रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पात्र रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून वैद्यकिय समितीमार्फत तपासून अर्थसहाय्य दिले जाते.

अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावी

अर्ज (विहीत नमुन्यात)
वैद्यकिय खर्चाचे अंदाजपत्रक / प्रमाणपत्र मुळप्रत डॉक्टरांच्या सही व शिक्यासह खाजगी रुग्णालय असल्यास सिव्हील सर्जन यांचेकडून प्रमाणित करणे आवश्यक आहे.)
तहसिलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला (रु. 1.60लाख पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.)
रुग्णाचे आधारकार्ड (महाराष्ट्र राज्याचे)
रुग्णाचे रेशनकार्ड (महाराष्ट्र राज्याचे)
संबंधीत आजाराचे रिपोर्ट असणे आवश्यक आहे.
रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करावी.
अपघात असल्यास, FIR किंवा MLC असणे आवश्यक आहे. अवयव प्रत्यारोपण असल्यास रुग्णालयाचे मान्यता प्रमाणपत्र अथवा ZTCC येथे नोंदणी केल्याची पावती जोडणे आवश्यक आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

Don`t copy text!