राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दीड तास चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकारणावर देखील चर्चा झाल्याची शक्यता आहे.
राज ठाकरे यांनी हिंदूत्वाचा मुद्दा मांडल्यानंतर आता भाजप आणि मनसेमध्ये युतीची शक्यता वर्तवली जात आहे. भेटीत राज्यातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देखील उघडपणे नाराजी बोलून दाखवली होती. त्यानंतर आता दोन्ही नेत्यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झालं आहे. राज्यामध्ये सातत्याने राजकीय नेत्यांकडून केले जाणारे धार्मिक वक्तव्यांवर आणि राज्यातील कायदा व सुव्यवस्था या मुद्दावर बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देखील दोन्ही नेत्यांची बैठक महत्त्वाची ठरणार आहे. आगामी निवडणुकीवर याचा परिणाम होऊ शकतो. यावर देखील चर्चा झाल्याची माहिती आहे. काही दिवसांपासून भाजप नेत्यांनी राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यातील युतीवर भाष्य केलं.आता राजकीय समीकरणं बदलतील का काय?, असं चित्र निर्माण होत आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम