द पॉईंट नाऊ प्रतिनिधी : पंजाबच्या जालंधर येथे 17 ते 23 जून दरम्यान पार पडलेल्या वोविनाम राष्ट्रीय मार्शल आर्ट्स स्पर्धेत महाराष्ट्रातून औरंगाबाद (संभाजीनगर) येथील श्री नारायण मार्शल आर्ट्स च्या मुलांनी सुयश प्राप्त केले.
जालंधर येथे पार पडलेल्या या स्पर्धेत श्री नारायण मार्शल आर्टस् च्या 40 मुले आणि 45 मुलींनी सहभाग नोंदवला होता. यातील आर्यन शिंदे, आदित्य सकुंडे, तृजल नन्नावरे, प्रतीक्षा पगारे, वेदिका वानखेडे, आकांक्षा सकुंडे, श्रेया नन्नावरे या मुलांनी सुयश मिळवले. यात 4 सुवर्ण पदक, 4 रौप्य पदक आणि 3 कांस्य पदकांची कमाई या खेळाडूंनी केली.
मुलांच्या या यशाबद्दल आम आदमी पार्टीचे नेते रघुनाथ पाटील, सदाशिव पाटील, जनार्दन पाटील, सुनील भालेराव, संजय नांगरे, प्रवीण हिवाळे, आशिष शिसोदे, मेघा राईकवार, सुदर्शन बारवल आदींनी या मुलांचे अभिनंदन केले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम