द पॉईंट नाऊ ब्युरो : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कोरोना झाल्या कारणाने रुग्णालयात दाखल झालेले होते. मात्र त्यांना नुकताच डिस्चार्ज मिळाला आहे.
महाराष्ट्रात राजकारणामध्ये आगडोंब उसळला. त्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. आणि यासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र चार दिवसांनंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
आता राज्यपाल कोश्यारी हे राजभवनात दाखल झाले आहेत. आता महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकारणाच्या गदारोळाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे आता सर्वांचेच लक्ष या हालचालींकडे लागून राहिले आहे.
महाराष्ट्रात एका रात्रीत अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी स्थापन केलेले सरकार सर्वांना लक्षात आहे. ज्यात भल्या पहाटेच शपथविधी आटोपल्याची चर्चा होती. त्यामुळे आता राज्यपाल कोश्यारी यांच्या राजभवनात आगमनानंतर राज्यात काय हालचाली होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम