Maratha Reservation | राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेत खोचक टीका केल्यानंतर आता मराठा समाज हा आक्रमक झाल्याचे दिसत आहे. छगन भुजबळ यांच्या त्या वक्तव्याविरोधात शनिवारी कोल्हापूर जिल्ह्यात निषेध करण्यात आला. इतकंच नाही तर कागल तालुक्यात म्हाकवे येथे मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहनदेखील करण्यात आले.
म्हाकवे येथील सकल मराठा समाज तसेच बहुजन समाज यांच्या वतीने बस स्थानकाच्या परिसरात भुजबळांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले गेले. यावेळी आंदोलकांकडून “एक मराठा लाख मराठा” अशा घोषणा देण्यात आल्या व तसेच मंत्री छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी अशी मागणीही करण्यात आली.
सकल मराठा समाजाकडून भुजबळांच्या पुतळ्यास “जोडो मारो” आंदोलनही करण्यात आले. मंत्री छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने हकलपट्टी करावी. तसेच, त्यांच्यावर राज्य शासनाने आळा घालावा. अन्यथा मराठा समाज हा त्यांना हिसका दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशाराच सकल मराठा समाजाने दिला आहे.
भुजबळ हे चिल्लर – मनोज जरांगे
काल मनोज जरांगे पाटील हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर आलेले होते. रात्री उशिरा कोल्हापूरातील दसरा चौकात सभा संपल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. यावेळी बोलताना, त्यांनी मंत्री भुजबळ हे दोन्ही समाजांत फुट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. यापुढे त्यांच्याकडे लक्ष देऊ नये. छगन भुजबळ हे आपल्यासाठी चिल्लर आहेत. अशा शब्दात त्यांनी मंत्री भुजबळ यांच्याकडे दुर्लक्ष करण्याचा सल्ला सकल मराठा समाजाला दिलेला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात वर्ल्डकपचा फिवर; कुठे विठ्ठलाला साकडं तर कुठे मिसळ फ्री…
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम