Maratha Reservation | राज्यात मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) वातावरण तापले असताना, सांभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून थेट दिल्ली गाठली असून, दिल्लीत त्यांनी सर्व महाराष्ट्राच्या खासदारांना बोलवत महत्तवाची बैठक घेतली आहे. यावेळी मध्यमानशी बोलताना ते म्हणाले की, “जर केंद्र सरकार व पंतप्रधान मोदी यांनी मराठा आंदोलनाची दखल घेतली नाही, तर गाठ थेट आमच्याशी आहे. आम्ही दिल्लीतही ठाण मांडून बसू, ह्या दिल्लीच्या थंडीत मराठे आंदोलन करतील, असा इशारा माजी खासदार सांभाजीराजे छत्रपती यांनी केंद्र सरकारला दिला आहे.
दरम्यान, मराठा आरक्षणासाठी दिल्लीत सांभाजीराजे छत्रपती यांनी राज्यातील सर्वपक्षीय खासदारांची बैठक ओलावली होती, ही बैठक पार पडली आहे. सध्या राज्यात धगधगत असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी ह्या खासदारांच्या बैठकीचं आयोजन केलेलं होतं. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून त्यांनी याआधी केंद्रीय मागासवर्ग आयोगाची भेट देखील घेतली होती. राजधानी दिल्लीमधील महाराष्ट्र सदनमध्ये या महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन केलेलं होतं. दरम्यान, ह्या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation)मिळावे, हेच मत सर्व उपस्थित खासदारांनी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे.
Maratha Reservation | आज मराठ्यांचे भवितव्य ठरणार; दिल्लीत मोठ्या हालचाली सुरू
तर गाठ मराठ्यांशी | (Maratha Reservation)
सरकारी नोक-या तसेच शैक्षणिक क्षेत्रातील आरक्षणात मराठा समाजाचे प्रतिनिधीत्व हे ४८ पैकी मोजले आहे. मराठा समाजाचे प्रतिनिधीत्व हे पुरेसे आहे. असे मत मत सुप्रीम कोर्टाचे आहे. दरम्यान, “केंद्र शासन व पंतप्रधान मोदी यांनी याप्रकरणाची तातडीने दखल घेतली जावी. तसेच, जर या ठरवाप्रमाणे केंद्र सरकारने या प्रकरणी लक्ष घातलं नाही तर, गाठ थेट आमच्याशी आहे. आम्ही थेट दिल्लीत ठाण मांडू”. सगळे मराठे ह्या दिल्लीच्या थंडीत येथे आंदोलन करतील”, असा इशारा संभाजीराजे छत्रपती यांनी दिला आहे.
जरांगेंमुळे हा प्रश्न ऐरणीवर
मला अत्यंत आनंद होत आहे आणि सोबटच दुःखही होतं आहे. “मी सर्वप्रथम हा मुद्दा मांडला याचा आनंद कारण तो पर्यंत कोणीही हा विषय मांडलेला नव्हता. आता अनेक खासदार हे मराठा समाजाला न्याय मिळावा यासाठी परखडपणे त्यांची बाजू मांडताहेत. दरम्यान, मनोज जरांगे यांच्यामुळे हा मराठा आरक्षणचा हा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला. मराठा समाजाला त्यांच्या हक्काचं आरक्षण का मिळावं हे अनेक जणांनी सांगितलंय पण, ते कसं मिळावं याविषयावर चर्चा व्हायला हवी. म्हणून ह्या बैठकीचे आयोजन केले होते. (Maratha Reservation)
Maratha Reservation | मराठा समाजाचे बोंबाबोंब आंदोलन
उपस्थित खासदार
शिवसेना (शिंदे गट) – खा. धैर्यशील माने, खा.श्रीकांत शिंदे, खा.संजय मंडलिक, खा. हेमंत गोडसे, खा. राहुल शेवाळे, खा. प्रतापराव जाधव, खा. गजानन किर्तीकर, खा. भावना गवळी.
भाजप – खा. धनंजय महाडीक, खा. उदयनराजे भोसले, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री खा. डॉ. भारती पवार, खा. रावसाहेब दानवे, खा. सुधाकर शृगारे, खा. रणजित निंबाळकर, खा. प्रतापराव चिखलीकर.
शिवसेना (ठाकरे गट) – खा. ओमराजे निंबाळकर
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – खा. प्रफुल्ल पटेल (Maratha Reservation)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम