Maratha Reservation | सरकारला नवा अल्टीमेटम; मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित

0
75
Maratha Reservation
Maratha Reservation

Maratha Reservation | जालना : सगेसोयरे अंमलबजावणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी गेल्या ६ दिवसांपासून पुन्हा उपोषण सुरू केले होते. तर, गेल्या दोन दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. यानंतर राज्य सराकारच्यावतीने मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) आणि छत्रपती संभाजी नगरचे नवनिर्वाचित खासदार संदीपान भुमरे यांनी जरांगेंची भेट घेतली. त्यांची मनधरणी केली असता अखेर जरांगेंनी नवा अल्टीमेटम देत उपोषण स्थगित केले आहे.

यावेळी त्यांनी जरांगे यांना सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीबाबत पुढील कार्यवाही सुरु असल्याची माहिती दिली. तसेच, मी प्रथमच तुमच्याकडे आलो असून, राज्य सरकारला २ महिन्यांचा कालावधी देण्याची मागणी शंभुराज देसाई यांनी केली. त्यानंतर, आता मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला १ महिन्याचा कालावधी देत उपोषण स्थगित केले असल्याची घोषणा केली.

पुढील १ महिन्यात सर्व मागण्या मान्य न झाल्या नाहीतर विधानसभा निवडणुकीत आम्ही पूर्ण तयारीने उभे राहणार असल्याचेही यावेळी जरांगे यांनी सांगितले. यानंतर, मंत्री शंभुराज देसाई आणि खासदार संदीपान भुमरे यांनी जारांगे यांना ज्युस पाजले आणि त्यांचं उपोषण सोडवलं. तर, मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित केल्याची घोषणा करताच अंतरवाली सराटी गावात गावकऱ्यांनी एकच जल्लोष केला.

Manoj Jarange Patil | जरांगेंची प्रकृती खालावली; उपोषण मागे घेण्याची फडणवीसांची विनंती

Maratha Reservation | आजपासून १३ जुलैपर्यंतचा वेळ 

पाच महिन्यांचा वेळ दिला. त्यापैकी २ महिने हे आचारसंहितेत गेले. वाशीच्या आंदोलनापसून आजपर्यंत ५ महिने दिले होते. पण सरकारने याकाळात काही केलं नाही. आम्ही तुम्हाला आता ३० जूनपर्यंतचा वेळ देतो. पण त्यांनी पूर्ण १ महिना मागितला असून, आता तुम्ही सांगा की काय करायचंय..? असा प्रश्न जरांगे यांनी उपस्थित लोकांना विचारला.

त्यानंतर, सरकारला आजपासून १३ जुलैपर्यंत असा १ महिन्याचा कालावधी देण्यात आला. पण १४ जुलैला मी सरकारचा एक शब्दही ऐकणार नाही. तसेच जर १ महिन्यात सरकारने आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीतर आम्ही विधानसभा निवडणूक लढवणार. १ महिना आम्ही देऊ. पण नंतर काही म्हणू नका. विधानसभेला उभा नाही केलं तर नावं घेऊन उमेदवार पाडणार, असा थेट इशाराच जरांगे पाटील यांनी उपस्थित नेत्यांना दिला.

Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या उपोषणाला आता अंतरवालीतील ग्रामस्थांचाच विरोध

काय आहेत मागण्या

  1. मराठ्यांना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्या.
  2. ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत. त्यांच्या सोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र द्या.
  3. ज्यांच्या नोंदी सापडल्या नाही त्यांच्याकडून शपथपत्र लिहून घ्या व कुणबी प्रमाणपत्रक द्या
  4. कोर्टातून आरक्षण मिळेपर्यंत मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना १०० टक्के मोफत शिक्षण.
  5. मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरावर वसतिगृह बांधा.
  6. मराठा आरक्षण मिळेपर्यंत कुठलीही सरकारी भरती करु नका, केल्यास मराठा समाजाच्या जागा राखीव ठेवा.
  7. राज्यातील सर्व मराठा आंदोलकांवरील दाखल गुन्हे मागे घ्या.
  8. SEBC च्या अंतर्गत झालेल्या 2014 च्या नियुक्त्या द्या.
  9. वर्ग १ व २ व पोलीस उपनिरीक्षक या पदाच्या नियुक्त्या द्या.

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here