Maratha Reservation | लेकरांनो आता खूप मोठे व्हा; जरांगेंची मराठ्यांना साद

0
13
Maratha Reservation
Maratha Reservation

Maratha Reservation |  तब्बल ४ महीने आणि २८ दिवसांच्या संघर्षानंतर अखेर मराठा समाजाच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. मनोज जरांगेंच्या लढ्याला मोठे यश आले आहे. दरम्यान, यावेळी “मराठा समाजाच्या लेकरांनी आता खूप शिका आणि मोठे व्हा.” असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले असून, ते मुंबईत बोलत होते.

Maratha Reservation | काय म्हणाले मनोज जरांगे..?

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणे हेच ध्येय होते. आता सगेसोयऱ्यांचा अध्यादेश देखील निघालाय. यामुळे मराठा समाजाला याचा खूप मोठा फायदा होणार आहे. मराठा समाजाच्या लेकरांनी आता खूप शिका आणि मोठे व्हा. मला माझे शरीर कधी साथ देते, तर कधी साथ देत नाही. उपोषण जीवावर घेतलं होत. असे, मी कधी दिसू दिले नाही. पण मराठा समाजाची लेकरं मोठी व्हायलाच हवी, असे आवाहन मनोज जरांगे यांनी मराठा समाजातील मुलांना केले आहे.

Maratha Reservation | मराठ्यांच्या ४ महीने २८ दिवसांच्या संघर्षाला यश

मनोज जरांगेंचा भावनिक प्रवास..!

मनोज जरांगे यांनी खूप संघर्ष केला. आरक्षणासाठी लढत असताना मधल्या काळात खूप संकट आले. राज्यातील आमच्या समाजातीलच काही लोकांनी यात खोडा घालण्याचा प्रयत्न केला. सरकार आणि विरोधकांनी रचलेले षडयंत्र मी उधळून लावली होती. असे असताना देखील मी कधीच मागे हटलो नाही. गेल्या ७० वर्षापासून मराठा समाज आरक्षणासाठी वाट बघत होता. मराठ्यांना कायम वेड्यात काढण्याचं काम केल जात होतं. मराठे इतक्या ताकदीने म्हणजेच कोटींच्या संख्येने मुंबईत आले.(Maratha Reservation)

मराठ्यांची ६४ किमी रांग लागली होती. कोट्यवधी मराठा मुंबईत घुसला त्यानतंर दुसऱ्याच दिवशी अध्यादेश काढण्यात आला. मराठा समाजालाच मी मायबाप मानले. समाजाने मला लेकराचा दर्जा दिला. समाजाला जेव्हाही मी हाक दिली तेव्हा समाज पाठिशी उभा राहिला. वेळेप्रसंगी माझ्या जीवावर देखिल बेतलं. पण काम करताना मी कधी हयगय केली नाही. आता सगेसोयऱ्यांचा अध्यादेश मराठ्यांनी हातात घेतलाच आहे. असे मनोज जरांगे यांनी त्यांचा भावनिक प्रवास सांगितला.

Manoj Jarange Mumbai | मराठा समाजाच्या ‘या’ मागण्या मान्य

माझ्या समाजानं खूप त्याग केला आहे. अनेकांची कुटुंब उघड्यावरच होती आणि आहेत. ज्या मायमाऊलींच्या कपाळाचे कुंकू पुसलं आहे, कर्ता पुरुष गेल्यावर त्या घरावर काय परिस्थिती असते आणि काय बेततं हे बोलणे खूप सोप्पे आहे. मी लवकरच अश्या कुटुंबियांची भेट घेणार आहे. आपण जिद्दी आहोत, एका ध्येयावरच अडलो तर मरायलाही तयार आहे. कधीच मागे हटणार नाही. मराठा समाज एकजूट झाला तर श्रीमंतांची गरज असावी असं काहीही नाही.

जर सर्वसामान्य मराठ्यांनी ठरवलं, मला साथ द्यायची. तर समाजाची शक्ती समाजासाठीच वापरली जाते. आता जबाबदारी वाढली आहे, वेळेप्रसंगी जीव गेला तरी आरक्षण मिळवून द्यायचेच हे मी ठरवलं. मी समाजातील प्रत्येकांच्या घरातील लेकरांसाठी लढत आहे. माझी जीव द्यायचीही तयारी आहे. तसेच, समाजाची ताकद मी इंचही वाया जाऊ दिली नाही. असे मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत.(Maratha Reservation)


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here