Maratha Morcha | सहा दिवसांचा पायी प्रवास करून अखेर आज मराठा आंदोलकांसह मनोज जरांगे हे नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केट येथे दाखल झाले आहेत. आता नवी मुंबई येथे आधी त्यांची सभा होईल आणि त्यानंतर ते मुंबईत दाखल होतील. दरम्यान, या पार्श्वभूमीवर आज सरकार मोठ्या हालचाली करत आहेत. सरकारचे शिष्टमंडळ हे जरांगे यांची भेट घेणार आहेत. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील जारांगेंची भेट घेण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे यांच्या मागणीप्रमाणे जीआर तयार झालेला असून, यासंदर्भातच राज्य सरकारचे शिष्टमंडळ त्यांची भेट घेणार आहेत.
नवी मुंबई येथील एपीएमसी मार्केटच्या मुख्य कार्यालयात मनोज जरांगे पाटील आणि शिष्टमंडळ यांच्यात ही चर्चा होणार आहे. सरकारतर्फे तयार करण्यात आलेला नवा जीआर व राजपत्राचा मसुदा मनोज जरांगे यांना यावेळी दाखवण्यात येणार आहे. त्यानंतर मनोज जरांगे हे वकिलांसोबत बैठक घेतील. गरज असल्यास त्यात काही बदल सूचवतील. नाहीतर, हा जीआर निघणार नाही. यामुळे मनोज जरांगे यांचे आंदोलन आज संपणार का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
(Maratha Morcha)
Manoj Jarange mumbai rally | झोपेत पोलिसांनी सह्या घेतल्या; जरांगेंनी केले आरोप
Maratha Morcha | सरकाच्या हालचाली वाढल्या
मनोज जरांगे पाटील आणि मराठा मोर्चा अहमदनगरमध्ये येताच सरकारकडून वेगने हालचाली सुरु झाल्या होत्या. सर्वप्रथम छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त हे मनोज जरांगेंना भेटले. त्यानंतर मनोज जरांगे हे पुण्यात दाखल झाले आणि तेथे पुण्याचे विभागीय आयुक्त त्यांना भेटले. मात्र, त्यांनाही अपयश आले. दरम्यान, आता जरांगे आणि मराठा मोर्चा नवी मुंबईत दाखल झाला आहे.
त्यानुसार, आता थेट सरकारचे शिष्टमंडळ हे नवी मुंबईत मनोज जरांगे पाटील यांच्याशी करणार आहे. सरकारने तयार केलेल्या या मसुद्यावर मनोज जरांगे हे त्यांच्या वकिलांसोबत बैठक घेतील. मनोज जरांगे यांनी हा मसुदा मान्य केल्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः मनोज जरांगेंना हा जीआर देणार आहेत.(Maratha Morcha)
Manoj Jarange | मनोज जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी नाकारली
मनोज जरांगेंची आज अखेरची सभा
आज मराठा मोर्चा नवी मुंबईत दाखल झाला असून, हा मोर्चा मुंबईत धडकण्याच्या आधीच आजच मराठा आरक्षणावर अंतिम तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारच्या वेगवान हालचाली सुरू झाल्या असून, जरांगेंनी त्यांचा दिनक्रम सुरु ठेवला आहे. आता नवीन मुंबईमध्ये वाशीच्या शिवाजी चौकात जरांगे सभा घेतील. दरम्यान, या सभेसाठी असंख्य मराठा समाज बांधव हे शिवाजी चौकात जमण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईत दाखल होण्यापूर्वीची जरांगेंची ही शेवटची सभा असेल. आता मुंबईमधून आरक्षण घेतल्याशिवाय परतणार नसल्याची ठोस भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतलेली आहे.(Maratha Morcha)
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम