Maratha andoln: मराठा योद्धा जरांगे पाटील यांनी आंदोलकांच्या विनंतीचा मान राखत मोठा निर्णय घेतला आहे. येणाऱ्या आंदोलनात जनतेच्या मागणीवरून मनोज जरांगे पाटील यांनी पाणी पिऊन उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आंदोलन अधिक तीव्र होणार असल्याचे दिसून येत आहे. याचवेळी राज्यातील जाळपोळ थांबवावी असे आवाहन देखील जरांगे यांनी केले आहे. या आवाहनाला समाज कशी साथ देतो हे बघणे महत्वाचे असणार आहे.
गेल्या सात दिवसांपासून सुरू असलेल्या मराठा आंदोलनास राज्यात अनेक ठिकाणी गालबोट लागला असून हिंसक वळण लागल्याच्या धक्कादायक घटना समोर आल्यात. या दरम्यान अंतरवली सराटी येथे देखील आंदोलन स्थळी नागरिकांची गर्दी वाढत आहे. आंदोलन सुरु असलेल्या ठिकाणी मनोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. यात जरांगे यांची ढासळती तबीयत चिंतेचा विषय बनला. जरांगे यांनी अन्न-पाणी यासोबतच वैद्यकीय उपचार घेण्यास देखील नकार दिल्याने त्यांची तब्येत अधिकच खालवत होती. यानंतर त्यांनी किमान पाणी तरी घ्यावं अशी विनंती मराठा समाजाच्या वतीने करण्यात येत होती. अखेर जरांगे यांनी मराठा समाजाचा मान ठेवत पाणी घेण्याचा निर्णय घेतल्याने समाजाला तूर्तास जरांगेच्या तबीयतिचा दिलासा मिळाला आहे.
थोड्याच वेळापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाली. जरांगे हे काही वेळात मराठा अभ्यासकांना बोलावणार असून त्यांच्याशी चर्चा करून पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ यांच्याशी जरांगे बोलणार आहेत. त्यामुळे आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर काय तोडगा काढला जातो का याकडे जनतेच्या नजरा लागून आहेत.
Maratha Andoln: मराठ्यांचा वणवा पेटला…! आंदोलनाला हिंसक वळण! बीड-उस्मानाबादमध्ये कलम 144 लागू
मनोज जरांगे पत्रकार परिषद
मराठा योद्धा जरांगेंच्या आवाहनानंतरही राज्यातील काही भागात हिंसक आंदोलन सुरूच आहे. जरांगे पाटील हे पत्रकार परिषद घेणार असून. जरांगे काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री शिंदेंशी फोनवरुन चर्चा केल्यानंतर काही वेळात माध्यमांशी बोलण्याचा निर्णय जरांगेनी घेतला. जरांगे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये अर्धा तास फोनवरुन चर्चा झाली आहे. जरांगे त्यासंदर्भात पत्रकार परिषदेत तपशील देतील.
Chandwad| आ. राहुल आहेर यांना आंदोलकांसह माजी आमदारांनी झाप झाप झापल
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम