मराठा आंदोलनाची धग क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेपर्यंत! पोलिसांनी पुढिल सामन्यांसाठी घेतली खबरदारी

0
22

वनडे वर्ल्डकप 2023 ही स्पर्धा आता रंगतदार वळणावर आलेली आहे. सातव्या टप्प्यापासून प्रत्येक सामन्यांचा निकाल हा उपांत्य फेरीसाठी मोठा उलटफेर करणारा ठरेल. त्यामुळे क्रिकेटच्या मैदानातील थरार क्रीडाप्रेमींना अनुभवता येणार आहे. असं असताना दुसरीकडे, राज्यात मराठा आरक्षणासाठीचा लढा आणखी तीव्र होताना दिसतो आहे. त्यामुळे मुंबई आणि पुण्यात होणाऱ्या सामन्यांसाठी पोलीस प्रशासन चोख बंदोबस्त ठेवत आहेत. पुण्यात होणाऱ्या श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यातही पोलिसांनी असाच कडा पहारा ठेवलेला आहे. हा सामना पाहण्यासाठी बरेच प्रेक्षक काळे कपडे परिधान करून आलेले होते. परंतु पोलीस आणि यंत्रणांनी त्या लोकांना प्रवेश नाकारला.

Manoj Jarange Patil| … आणि जरांगे पाटील स्टेजवरच कोसळले

मराठा आरक्षणासाठी राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाचे पडसाद वर्ल्डकप सामन्यांमध्ये उमटू नयेत, यासाठी खबरदारी घेतली जाते आहे. काळे कपडे दाखवून याचा निषेध करू नये. यासाठी पाऊल उचलले जात आहेत. यामुळे जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या क्रीडाप्रेमींचा मात्र हिरमोड झालेला आहे. पोलिसांनी कोणतीही पूर्वकल्पना न दिल्याने असे पाऊलं उचलल्याने प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. श्रीलंका आणि अफगाणिस्तान सामन्यानंतर या मैदानात आणखी तीन सामने होणार आहेत. मराठा आरक्षणाचा तोडगा निघाला नाही तर प्रेक्षकांना पुढेही अशाच परिस्थितीला सामोर जावे लागू शकते.

आता राजकारण्यांना मंदिरातही प्रवेश बंदी; मराठा आरक्षणासाठी असा निर्णय घेणारे पहिलंच मंदिर

मराठा ामनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस आहे. उपोषणाच्या सहाव्या दिवशी मनोज जरांगे पाटील स्टेजवर उभे असताना कोसळले.त्यांची प्रकृती ढासळल्याने तणावाचं वातावरण आहे. यावेळी उपस्थितांनी त्यांना पाणी पिण्याची विनंती केली.

1 नोव्हेंबर रोजी न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका सामना याच मैदानात होणार आहे. 8 नोव्हेंबर रोजी इंग्लंड आणि नेदरलँड यांच्यात याच मैदानावर सामना रंगणार आहे आणि 11 नोव्हेंबर रोजी ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यातील लढत येथेच होईल.


author avatar
Team The Point Now
सर्वसामान्यांसाठीचे एक व्यासपीठ.. जिथे होईल प्रत्येक मुद्दा अधोरेखित..

The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here