मान्सून संदर्भात महत्वाचे अपडेट ; शेतकऱ्यांनो वाचा सविस्तर

0
3

देशात मान्सूनची मजल आग्नेय यू पी पर्यंत गेली असुन देशाचा ६०% भाग व्यापला आहे. त्याची उत्तर अधिकतम सीमारेषा सध्या देशाच्या पोरबंदर  बडोदा शिवपुरी चूर्क ह्या शहरातून जाते.

काल कोकणात अलिबाग, मुंबई कुलाब्यात प्रत्येकी ७ सेमी पाऊस कोसळला आहे. सध्याही अरबी समुद्रात दक्षिणोत्तर दिशास्थित तटीय कमी दाब फळी क्षेत्र व बळकट, आर्द्रतायुक्त समुद्रीय पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे पुढील  ५ दिवस कोकण, गोव्यात, तसेच मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर असाच तर परवा बुधवार २२ पासुन उर्वरित महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा मोसमी पाऊस कोसळण्याची  शक्यता जाणवते.

देशाच्या अंदमानसह पूर्वेकडील ४, तर पूर्वोत्तरेकडील ७, व लक्षद्विपसह दक्षिण द्विपकल्पतील ४ राज्यात मान्सूनचा धुमाकूळ चालू असून चांगल्या मान्सून घडामोडीसाठी वातावरण अनुकूल असुन २ दिवसाच्या प्रतीक्षेनंतर समाधानकारक मोसमी पावसाची शक्यता जाणवते. तेंव्हा शेतकऱ्यांनी संयम ढळू न देता उत्तम ओलीवरच पेरण्या करून खरीप हंगाम जिंकावा, असे आवाहन माणिकराव खुळे यांनी केले आहे.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here