महाराष्ट्रात पुढील १० दिवस मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता – खुळे

0
42

कृषी प्रतिनीधी; सोमवार(२७ जून )पासून  ते बुधवार (६ जुलै )पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी मध्यम ते मुसळदार तर मुंबईसह कोकण, गोवा व विदर्भात(बुधवार २९ पासुन) अतिजोरदार पावसाची शक्यता जाणवते.

मराठवाड्यात मंगळवार -बुधवार(२८-२९) फक्त दोन दिवस पावसाचा प्रभाव काहीसा कमी जाणवेल.
वरील पाऊस हा अरबी समुद्रात दक्षिणोत्तर दिशास्थित तटीय कमी दाब द्रोणीय क्षेत्र तसेच बळकट, आर्द्रतायुक्त समुद्रीय पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे होवु शकतो. पाऊस होणार असून पेरण्या पुर्ण कराव्यात असे आवाहन खुळे यांनी केले आहे.

उत्तराखंडातील हिमालयीन बद्री- केदार पर्यटकांना उद्यापासून पुढील ३ दिवस(गुरुवार पर्यंत) जोरदार पूर्वमोसमी अवकाळी पावसाचा सामना करावा लागेल, असे वाटते. वातावरणाचा कानोसा घेऊनच चढाई करावी.

जम्मू काश्मीर पर्यटनासाठी आजपासून पुढील आठवडाभर वातावरण काहीसे ठीक असेल.

पंढरीवारी वारकऱ्यांना  वारी उत्तर्धात २९-३० पासून कधी पाऊस तर कधी उघडीप तर ६ जुलै पासुन काहीसा पाऊस अश्या वातावरणासोबत वाटचाल करावी लागेल. वरील वातावरणीय प्रणालीत जर काही बदल झाल्यास लगेचच कळवले जाईल.


The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटरयुट्युबइंस्टाग्राम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here