काल वेंगुर्ल्यात दाखल झालेला मान्सून आज सिंधुदुर्ग, रत्नागिरी, मुंबई ठाणेसहित काही भाग वगळता जवळपास संपूर्ण कोकण म्हणजे १५-२०% महाराष्ट्र काबीज करत पुणे, डहाणू पर्यंत पोहोचला आहे अशी माहिती हवामांनतज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली आहे.
नाशिकमध्ये पोहोचण्यास अजुन त्याला ठाणे जिल्ह्यातील जव्हार मोखाडा तर उत्तर कोकणातील इगतपुरी त्र्यंबकेश्वर पेठ भाग ओलांडवयाचा आहे. पुढील ३ दिवसात म्हणजे मंगळवार दि. १४ जूनपर्यंत संपूर्ण घाटमाथा व धुळे जळगांव नाशिक नगर सांगली सोलापूर सम्पूर्ण जिल्हे तर पुणे सातारा कोल्हापूर जिल्ह्याचा उर्वरित तर मराठवाड्याचा काही भाग काबीज करण्यासाठी सध्या तरी वातावरणीय अनुकूलता जाणवते.
विदर्भात पुढील ५ दिवस पूर्वमोसमी अवकाळी पावसाची शक्यता असुन, ह्यातूनच मान्सूनची बं उ. सागर शाखा उगम पावण्याची शक्यता जाणवत आहे, हे सर्व असले तरी ज्या पद्धतीने मान्सूनच्या आगमनात जोर असायला हवा तसा दिसत नाही. त्याचीही वातावरणीय कारणे आहेत.
सध्या मान्सूनच्या वाटचालीवर, हालचालीवर लक्ष ठेवू या! वाट बघू या! सगळ्यात महत्वाचे पेरणीची घाई करू नये असे खुळे यांनी सांगीतले.
The Point Now न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर । युट्युब । इंस्टाग्राम